विस्तारा एअरलाइन्सची मोठी घोषणा; डॉक्टर, नर्सेसना देशभर मोफत प्रवासाची सुविधा

विस्तारा एअरलाइन्सची मोठी घोषणा; डॉक्टर, नर्सेसना देशभर मोफत प्रवासाची सुविधा

नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाच्या (Civil Aviation Ministry) संयुक्त सचिव उषा पाधी(Usha Padhee) यांना एक पत्र लिहून विस्तारा एअरलाइन्सने याची माहिती दिली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 एप्रिल : कोविड-19 च्या (Covid19) संकट काळात डॉक्टर्स आणि नर्सेसना देशभरात मोफत प्रवासाची सोय देण्याचा निर्णय विस्तारा एअरलाइन्सने (Vistara Airlines)जाहीर केला आहे.'मनीकंट्रोल डॉट कॉम'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाच्या (Civil Aviation Ministry) संयुक्त सचिव उषा पाधी(Usha Padhee) यांना एक पत्र लिहून विस्तारा एअरलाइन्सने याची माहिती दिली आहे.

'आम्ही या संकटकाळात सरकारी संस्था, हॉस्पिटल्सना हवाईमाल वाहतुकीत (Airologistics) साह्य करू इच्छितो. आम्ही या संदर्भात सरकारमान्य संस्था, तसंच केंद्र आणि राज्य सरकारी संस्थांच्या अशा गरजापूर्ण करण्यात आम्ही साहाय्य देऊ इच्छितो. आम्ही आमच्या विमानांमध्ये उपलब्ध जागेच्या अनुषंगाने जास्तीत जास्त साहाय्य करण्याचा प्रयत्न करू,'असं विस्तारा एअरलाइन्सने पाधी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

उषापाधी यांनी असं पत्र आल्याची माहिती ट्विट करून दिली आहे.'सरकारी संस्था आणि हॉस्पिटल्सची तातडीची गरज लक्षात घेऊन विस्तारा हवाई माल वाहतूक सेवा देणार आहे. तसंच, कोरोनाच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी डॉक्टर्स (Doctors) आणि नर्सेसना (Nurses) देशभरात मोफत प्रवासाची सुविधा देण्याचा प्रस्तावही कंपनीने ठेवला आहे. आपण सगळे मिळून या संकटाचा सामना करू,'असं पाधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

हे ही वाचा-निवडणुकीच्या प्रचारसभा घेतल्या तेव्हा परग्रहावर होता का?' हायकोर्टाने फटकारलं

'सीट्सची मर्यादित उपलब्धता लक्षात घेऊन आम्ही' प्रथम येणाऱ्यास प्राधान्य'या तत्त्वावर वैद्यकीय व्यावसायिकांना मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून देऊ,'असंही विस्ताराने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. विस्तारा एअरलाइन्स हा टाटासन्स आणि सिंगापूर एअरलाइन्सचा संयुक्त उपक्रम आहे. 2015 पासून ही एअरलाइन्स सुरू झाली. देशातली बिकट परिस्थिती पाहून अनेक खासगी कंपन्यांनी शक्य त्या मदतीचा हात पुढे केला आहे. त्यात टाटा कंपनी आघाडीवर आहे. लिक्विड ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी 24 क्रायोजेनिक कंटेनर्स आयात करण्याचा निर्णय नुकताच टाटा ग्रुपने घेतला.

त्यामुळे देशाला सध्या मोठ्या प्रमाणावर जाणवत असलेला ऑक्सिजनचा तुटवडा कमी होण्यास हातभार लागणार आहे. महिंद्रा ग्रुपनेही अशाच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची मदत करून देश संकटातून बाहेर येण्यासाठी हातभार लावला आहे. आपल्या कंपनीची रिसॉर्टस् कोविड सेंटर म्हणून वापरण्यास देणं, आपल्या कंपन्यांमध्ये व्हेंटिलेटर्सची निर्मितीकरणं,अर्थसाह्य करणं वगैरे उपक्रम महिंद्रा कंपनीने राबवले. आणखीही अनेक कंपन्यांनी आपापल्या परीने अशी मदत देऊ केली आहे.

First published: April 26, 2021, 11:52 PM IST
Tags: corona

ताज्या बातम्या