मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Coronavirus: संकटकाळात यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी भरत जाधवची नवीन संकल्पना; नागरिकांना केलं कळकळीचं आवाहन

Coronavirus: संकटकाळात यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी भरत जाधवची नवीन संकल्पना; नागरिकांना केलं कळकळीचं आवाहन

Coronavirus in Maharashtra: कोरोना काळात आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी मराठी अभिनेते भरत जाधव यांनी एक नवीन संकल्पना सुचवली आहे. त्यांची संबंधित पोस्ट इन्स्टाग्रामवर वेगाने व्हायरल होतं आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 24 एप्रिल: सध्या महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. याचा प्रचंड ताण राज्यातील आरोग्य यंत्रणेवर पडत आहे. परिणामी अनेक रुग्णांना ऑक्सिजन, बेड आणि इतर वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत. अशा स्थितीत अनेक रुग्णांवर हॉस्पिटलच्या मोकळ्या जागेत उपचार करावे लागत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्णांची हेळसांड होतं आहे. एकंदरीत महाराष्ट्राचं असं चित्र असताना अनेक सामाजिक कार्यकर्ते, अभिनेते, स्वयंसेवी संस्था आपली सामाजिक बांधिलकी जपत गरजवंताच्या मदतीले धावले आहेत.

अशातच मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते भरत जाधव यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी एक नवीन संकल्पना सुचवली आहे. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली असून या पोस्टद्वारे राज्यातील सर्व जनतेला आवाहन केलं आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट वाचली, संकल्पना आवडली म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे.' यावेळी त्याने एका अपार्टमेंटमधील रुग्णावर उपचार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या पद्धतीचा उल्लेख केला आहे.

यावेळी त्याने म्हटलं की, एका सोसायटीत एकूण चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. दरम्यान रुग्णालयात बेड मिळत नसल्यानं त्यांना आपल्या घरातच राहावं लागत होतं. पण घरात वयोवृद्ध लोकं असल्यानं त्यांनाही कोरोनाची लागण होण्याची भीती होती. त्यामुळे संबंधित सोसायटीने अपार्टमेंटमधील एका मोकळ्या फ्लॅटमध्ये या चारही जणांची राहाण्याची व्यवस्था केली. तर ज्याचा फ्लॅट होता, त्या व्यक्तीला सहा महिन्यांचा मेंटेनन्सही माफ केला. या चारही रुग्णांना पूर्णपणे बरं व्हायला 15 दिवस लागले.'

View this post on Instagram

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

हे ही वाचा-रिया चक्रवर्तीचा कोरोना ग्रस्तांना मदतीचा हात; सोशल मीडियावर म्हणाली...

पण अशाप्रकराची पद्धत वापरल्यानं दरम्यानच्या काळात सोसायटीतील इतर कोणालाही कोरोना विषाणूची लागण झाली नाही. हीच संकल्पना राज्यात सर्व ठिकाणी प्रत्यक्षात आणली तर आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होईल. यामुळे तुमचे रिकामे फ्लॅट, घरं, गाळे आणि हॉलचा वापर कोविड रुग्णांसाठी करावा, असं कळकळीचं आवाहन भरत जाधवने राज्यातील नागरिकांना केलं आहे.

First published:

Tags: Actor, Corona, Marathi cinema