नवी दिल्ली 12 ऑगस्ट : कोरोनापासून (Coronavirus) बचावासाठी भारतात लसीकरण (Corona Vaccination in India) मोहिमेचा वेग वाढवण्यावर भर दिला जात आहे. मात्र, अद्याप भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) कोव्हॅक्सिन (Covaxin) लशीच्या वापरास आंतरराष्ट्रीय स्तरावर मंजुरी मिळालेली नाही. अशात आता जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं, की भारत बायोटेकद्वारे निर्मिती झालेल्या या लशीला आतापत्कालीन मंजुरी देण्याबाबत सप्टेंबर महिन्यात निर्णय घेतला जाऊ शकतो. ही लस अद्याप कोणत्याही पाश्चिमात्य देशाच्या नियामक संस्थेने मंजूर केलेली नाही.
लवकरच गंगेतल्या पाण्यानं कोरोनावर उपचार करता येणार? नवी माहिती समोर
डब्ल्यूएचओचे लसींसाठी असलेले सहाय्यक महासंचालक डॉ मरियान्गेला सिमाओ म्हणाले की, संयुक्त राष्ट्रसंघाचा भारत बायोटेकच्या लसीबद्दलचा आढावा “थोडा चांगला” आहे. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत अधिकारी निष्कर्षापर्यंत पोहोचतील अशी आशा आहे. या लसीवर काही अभ्यास प्रकाशित झाले आहेत. भारतातील कोणत्याही संशोधकाने लसीवर कोणतेही प्रगत संशोधन प्रकाशित केलेले नाही. ही लस भारतात वापरण्यासाठी मंजूर झाली आहे. भारतातील शास्त्रज्ञ म्हणतात, की ही लस 78 टक्के प्रभावी आहे.
घोड्यांच्या अँटीबॉडीजपासून कोल्हापुरात Corona औषध, 90 तासांत बरा होणार रुग्ण
भारत बायोटेकने गेल्या जुलैमध्ये सांगितलं होतं, की कंपनीने आपत्कालीन वापर सूचीमध्ये कोव्हॅक्सिनचा समावेश करण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केली आहेत. कंपनीनं म्हटलं होतं, की लसीची पुनरावलोकन प्रक्रिया सुरू झाली आहे आणि अशी शक्यता आहे की लसीला लवकरात लवकर डब्ल्यूएचओकडून ईयूएल मिळू शकेल. EUL हे एक लायसन्स असतं. जे डब्लूएचओकडून प्राप्त झाल्यानंतर कंपनी सार्वजनिक आरोग्य संकटानं प्रभावित लोकांसाठी लस उपलब्ध करून देऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccination, Corona vaccine