नवी दिल्ली, 12 डिसेंबर: भविष्यात बुस्टर डोसची (Booster dose) गरज असल्याचं मत ‘भारत बायोटेक’चे व्यवस्थापकीय संचालक (Bharat Biotech) कृष्ण एलांनी (Krishan Ella) व्यक्त केलं आहे, तर सध्याची लस नव्या (New vaccine) व्हेरिएंटवर (Variant) प्रभावशाली असल्याचं सीरम इन्स्टिट्यूटच्या अदार पूनावाला (Adar Poonawala) यांनी म्हटलं आहे. नेटवर्क 18 नं कोरोना लसीकरणाबाबत जागरुकता वाढवण्यासाठी आयोजित केलेल्या ‘Sanjeevani – A Shot Of Life’ या अभियानात दोघांनीही आपली मतं व्यक्त केली. लसीकरणाबाबत भारतानं पार केलेल्या ऐतिहासिक टप्प्याच्या आनंदाप्रित्यर्थ नेटवर्क-18 च्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
Watch LIVE, the grand finale of @Network18Group’s #Sanjeevani – A Shot Of Life, a @FederalBankLtd CSR initiative, India’s biggest vaccination awareness drive against Covid-19. Join us as we fight to make India vaccine aware. #PooraTikaLagao@Apollo24x7 https://t.co/uqC03JZfG0
— News18 (@CNNnews18) December 12, 2021
सध्याची लस प्रभावी
‘Sanjeevani – A Shot Of Life’ या उपक्रमादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या टेलिथॉन या कार्यक्रमात सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला यांनी नव्या व्हेरिएंटबाबत भाष्य केलं. कोरोनाचा नवा व्हेरिएंट आला असून त्याबाबत पुरेसं संशोधन होण्याआधीच गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न होत असल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. सध्याची लस ही महाभयंकर मानल्या जाणाऱ्या डेल्टा प्लस व्हेरिएंटवरदेखील प्रभावशाली होती आणि त्यानंतर आता आलेल्या ओमिक्रॉनवरदेखील प्रभावशाली ठरत असल्याचं ते म्हणाले. जगातील अनेक कंपन्यात ओमिक्रॉनवर प्रभावशाली ठरू शकेल, अशा वेगळ्या लसींवरदेखील काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. गरज भासलीच, तर बुस्टर डोसच्या स्वरूपात आम्ही ती लस लॉन्च करू, असंही त्यांनी सांगितलं.
हे वाचा- Omicron Update: Corona च्या 'या' दोन लसी देतात 'कमी संरक्षण'- स्टडी
म्युटेशन ही चांगली गोष्ट
कुठलाही व्हायरल म्युटेट होणं ही तो व्हायरस कमजोर होऊ लागल्याचं लक्षण असतं, असं भारत बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्ण एला यांनी म्हटलं आहे. एखाद्या विषाणूत सतत बदल होत गेले, तर तो जिवंत राहण्याची क्षमता कमी कमी होत जाते. त्यामुळे नवा व्हेरिएंट येणं, ही खरं तर मानवजातीसाठी आनंदाची बाबच मानली पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. बुस्टर डोसचं समर्थन करताना व्हायरसची शक्ती कमी होऊ लागल्यामुळे त्याला घाबरण्याची गरज नसल्याचं ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona vaccine