मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

लहान मुलांना गाठतोय कोरोना! बंगळुरूत दहशत सुरूच; 11 दिवसांत 543 मुलांना संसर्ग

लहान मुलांना गाठतोय कोरोना! बंगळुरूत दहशत सुरूच; 11 दिवसांत 543 मुलांना संसर्ग

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका असल्याचा इशाराही गेले काही दिवस वारंवार दिला जात आहे. हा इशारा खरा ठरू लागला आहे.

बंगळुरू, 13 ऑगस्ट: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग व्हायचा धोका आहे, हे तज्ज्ञांनी दोन महिन्यांपूर्वीच वर्तवलं होतं. ते संकेत आता खरे ठरत आहेत. बंगळुरू शहरात या विषाणूने लहान मुलांवर हल्ला करत दहशत वाढवली आहे.

कोरोना संसर्गाची दुसरी लाट (Second wave of coronavirus in India) काहीशी आटोक्यात आल्यासारखं चित्र दिसत असलं, तरी तिसरी लाट (Third wave of Covid-19) येण्याचा धोका अनेक तज्ज्ञ वर्तवत आहे. तसंच, तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका असल्याचा इशाराही गेले काही दिवस वारंवार दिला जात आहे. हा इशारा खरा ठरू लागल्याचे संकेत म्हणता येतील, अशी स्थिती कर्नाटकातल्या बेंगळुरू (Bengaluru) शहरात गेले 10 दिवस अनुभवायला मिळते आहे. पहिल्या पाच दिवसांत बेंगळुरूमध्ये 242 मुलांना कोविड-19ची (Covid19) लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.  त्यामुळे तिसरी लाट (Corona Third Wave) सुरू झाली असून, अपेक्षेप्रमाणे मुलांमध्ये कोरोना संसर्गाचं प्रमाण वाढलेलं दिसत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

1 ते 11 ऑगस्ट दरम्यान एकट्या बंगळुरू शहरात किमान 543 मुलांचा कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आहे. 0 ते 18 वयोगटातली ही मुलं आहेत.

बेंगळुरू महानगरपालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, 10 ते 19 वर्षांतल्या 305 जणांचा कोरोना रिपोर्ट गेल्या 10 दिवसांत पॉझिटिव्ह आला आहे. त्यात नऊ वर्षांखालच्या 100 च्या आसपास मुलांना कोरोना गाठलं आहे. त्यातच आता कर्नाटकात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला तर ही संख्या तिपटीने वाढू शकते असा इशारा तज्ज्ञ देत आहेत.

आरोग्य विभागाच्या (Health Department) एका अधिकाऱ्याने सांगितलं, 'लहान मुलांमधल्या कोरोना संसर्गाचं प्रमाण येत्या काही दिवसांत तिप्पट होऊ शकतं. हे खूप धोकादायक आहे. मुलांना त्यापासून वाचवण्यासाठी आपण एकच गोष्ट करू शकतो, ती म्हणजे त्यांना घरातच ठेवणं. मुलांच्या शरीरातली प्रतिकारशक्ती मोठ्यांएवढी नसते. त्यामुळे पालकांना कळकळीचं आवाहन आहे, की त्यांनी त्यांच्या मुलांना घराबाहेर पडू देऊ नये. तसंच, कोरोनाच्या अनुषंगाने सर्व नियमांचं पालन केलं जावं.'

कर्नाटक सरकारने रात्रीची संचारबंदी (Night Curfew), तसंच शनिवार-रविवारच्या संचारबंदीचे (Weekend Curfew) आदेश यापूर्वीच लागू केले आहेत. केरळमधून, तसंच महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवशांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. आधीच्या 72 तासांमध्ये केलेल्या आरटी-पीसीआर चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह असेल, अशा व्यक्तींनाच राज्यात प्रवेश दिला जात आहे. काही सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 16 ऑगस्टपासून राज्यात अंशतः लॉकडाउन लागू केलं जाणार असल्याची शक्यता आहे.

या राज्यात शाळा उघडताच दोन शाळांमध्ये कोरोनाचा शिरकाव; 20 मुलं बाधित

कर्नाटक (Karnataka) राज्यात गेल्या महिन्याभरात दररोज सुमारे दीड हजार कोरोनाबाधितांची भर पडत आहे. कर्नाटकात सध्या महिन्याला लशीचे 65 लाख डोसेस दिले जात आहेत. हे प्रमाण वाढवून एक कोटीपर्यंत नेणार असल्याची ग्वाही कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांनी दिली आहे.

First published:

Tags: Bengaluru, Coronavirus