मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

काढा प्यायल्यामुळे लिव्हरला त्रास होतो? आयुष मंत्रालयाने काय सांगितलं पाहा!

काढा प्यायल्यामुळे लिव्हरला त्रास होतो? आयुष मंत्रालयाने काय सांगितलं पाहा!

काढा प्यायल्यामुळे यकृतावर परिणाम होतो असा दावा केला जात असतानाच आता आयुष मंत्रालयाने (Ayush Mantralay) या द्याव्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

  • Published by:  Amruta Abhyankar

नवी दिल्ली, 07 ऑक्टोबर: काढा प्यायल्यामुळे यकृताला (Liver) त्रास होतो असा दावा वारंवार करण्यात येत होता. पण खुद्द आयुष मंत्रालयाने (Auysh Mantralay) हा दावा फोल ठरवला आहे. आयुष मंत्रालयाने सांगितलं की, ही अतिशय चुकीची धारणा आहे. काढा बनवण्यासाठी वापरले जाणारे सगळचे पदार्थ आपण नेहमीच स्वयंपाकामध्ये वापरतो. हे पदार्थ भारतामध्ये अनेक वर्षांपासून वापरले जात आहेत. त्यामुळे काढा प्यायल्यामुळे यकृताला अर्थात लिव्हरला कोणताही अपाय होत नाही.

कोरोना (Corona) काळात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काढा पिण्याचा सल्ला आयुष मंत्रालयानेच दिला होता. आयुष मंत्रालयाचे राजेश काटेचा यांनी सांगितलं की, काढा बनवण्यासाठी दालचिनी, तुळस, काळीमिरीचा वापर केला जातो. या पदार्थाच्या एकत्रित सेवनामुळे आपले श्वसनतंत्र सुधारते. या पदार्थांसोबत सुंठ, मनुकांचादेखील काढ्यामध्ये वापर करावा.या काढ्याचं सेवन दिवसातून एकदातरी करणं आवश्यक आहे.

हे वाचा-मास्क आणि लशींना विरोध; भारतातील Anti-Mask Movement चं काय आहे कारण

कोरोनावर सध्यातरी कोणतीही लस (Vaccine) सापडलेली नाही. पण या काढ्यामुळे प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. त्यामुळे कोरोनाच्या सुरुवातीच्या काळापासूनच हा काढा पिण्याचा सल्ला दिला होता. तसंच काढ्यामुळे लिव्हरवर काही वाईट परिणाम होतो अशा चर्चांना खुद्द आयुष मंत्रालयानेच पूर्णविराम दिला आहे. कोरोना लसीवर सध्या जगभरात संशोधन सुरू आहे. लसीच्या चाचण्या घेऊन येत्या काही महिन्यात कोरोनावरील बाजारात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतातही अनेक महत्वाच्या कंपन्या कोरोनाच्या लसीबाबत संशोधन करत आहेत. जगातील काही देशांनी कोरोनावर लस सापडली असल्याचा अनेकदा दावा केला होता. पण अद्याप कोणालाही लसीची योग्यता सिद्ध करता आलेली नाही. त्यामुळे लस मिळत नाही तोपर्यंत कोरोना होऊ न देणं हाच एकमेव उपाय सर्व नागरिकांसमोर आहे.

First published:

Tags: Corona, Covid19