• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • ...तर दुसरा डोस 45 आठवड्यांनंतर; आणखी वाढणार कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर?

...तर दुसरा डोस 45 आठवड्यांनंतर; आणखी वाढणार कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर?

Image credit/pexels-nataliya-vaitkevich

Image credit/pexels-nataliya-vaitkevich

कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतराबाबत नुकतंच एक संशोधन समोर आलं आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 28 जून : भारतात सध्या कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड (Covishield)  या कोरोना लशी दिल्या जात आहे. सुरुवातीला या दोन्ही लशींचे दोन डोस 28 दिवसांच्या अंतराने दिले जात होते. पण यानंतर कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर (Gap between corona vaccine dose) बदलण्यात आले. सुरुवातीला 28, त्यानंतर 6 ते 8 आठवडे आणि मग 12 ते 16 आठवड्यांनी दुसरा डोस घेण्यास सरकारने सांगितलं. पण कदाचित हे अंतर 45 आठवड्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. कारण याबाबत नुकतंच एक संशोधन समोर आलं आहे. अॅस्ट्राझेनेका (Astrazeneca), ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोरोना लशीबाबत ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने (Oxford University) आणखी अभ्यास केला. कोरोना लशीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये 45 आठवडे म्हणजे जवळपास 10 महिन्यांचं अंतर असेल तर त्याचा प्रभाव जास्त होतो, असं दिसून आलं आहे. हे वाचा - कोरोनाची तिसरी लाट येणार, येणार पण कधी? मोदी सरकारने अखेर दिली महत्त्वाची अपडेट 45 आठवड्यांनी कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला तर रोगप्रतिकारक शक्ती कमी होत नाही तर उलट कोरोनाविरोधातील इन्युनिटी अधिक मजबूत होते. दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमध्ये जर अंतर जास्त जरी असेल तर त्याचा जास्त प्रभाव दिसून येतो. तर सहा महिन्यांनी डोस दिला तर अँटिबॉडी अधिक चांगल्या होतात, असंही या अभ्यासात स्पष्ट झालं. अद्याप या संशोधनाचं पीअर रिव्ह्यू झालेलं नाही. ऑक्सफोर्डने केलेल्या या ट्रायलचे प्रमुख संशोधक अँड्र्यू पोलार्ड यांनी सांगितलं, दुसरा डोस घेतल्यानंतर तिसऱ्या डोसचे चांगले परिणाम समोर आले आहेत. पहिला डोस घेतल्यानंतर 10 महिन्यांनी तिसरा डोस घेतला तर त्याचा चांगला प्रभाव दिसून आला. हे वाचा - Pregnancy मध्ये कोरोनाचा धोका वाढला! 2 दिवसांचा गर्भही कोविड पॉझिटिव्ह भारतात ही लस सीरम इन्स्टिट्यूटमार्फत कोविशिल्ड (Covishield) नावाने उत्पादित केली जाते आहे. याआधी ब्रिटनमध्ये झालेल्या संशोधनानुसारच भारतातही या लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्यात आलं होतं. त्यामुळे आता या संशोधनानंतरही भारतात कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
  Published by:Priya Lad
  First published: