मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Covid Symptoms in kids: लहान मुलांना कोरोनाची लागण झालीच तर अशी 8 लक्षणं दिसतात; वेळीच ओळखा

Covid Symptoms in kids: लहान मुलांना कोरोनाची लागण झालीच तर अशी 8 लक्षणं दिसतात; वेळीच ओळखा

कोरोनाचा नवीन व्हेरियंट XE (covid xe variant) आल्यापासून मुलांना संसर्ग होण्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. मुलांना होणारे आजार पटकन ओळखणं गरजेचं असतं. कोरोनाची लक्षणे वेळीच ओळखून डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास मुलाला होणारा त्रास कमी होतो.

पुढे वाचा ...
    मुंबई, 29 एप्रिल : कोरोना व्हायरसची चौथी लाट येण्याची शक्यता वाढल्याने पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. त्यातच आता लहान मुलांनाही कोविड 19 ची बाधा होत आहे. कोरोनाचा नवीन व्हेरियंट XE (covid xe variant) आल्यापासून मुलांना संसर्ग होण्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कोविड 19 चा सर्वाधिक धोका वृद्ध लोक आणि मुलांना असतो. अशा परिस्थितीत आपल्या मुलाची विशेष काळजी घेतली पाहिजे. लहान मुलांच्या आरोग्याच्याबाबतीत काही समस्या असल्यास गांभीर्याने घेत डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. आत्तापर्यंत नोंदवलेल्या सर्व प्रकरणांमध्ये मुलांमध्ये आढळून आलेल्या (Covid symptoms in kids) लक्षणांविषयी माहिती घेऊया. ताप - ताप हे कोरोना लक्षणांमधील सर्वात महत्त्वाचे लक्षण आहे. जर मुलाला अचानक ताप आला असेल तर आपण त्याकडे दुर्लक्ष करू नये. सतत खोकला किंवा कोरडेपणा वारंवार खोकला किंवा कोरडा खोकला हे देखील कोरोनाचे लक्षण आहे. यामध्ये मुलांचा घसा हळूहळू कोरडा होऊ लागतो. वास किंवा चव कमी होणं कोविडची लागण झाल्यानंतर अनेक मुलांना कशाची चव किंवा वास येत नाही. तसं हे आपल्याला समजणं कठीण काम आहे, कारण मुलांना ते स्वतःलाच समजत नाही, परंतु आपण काही मार्गांनी ते शोधू शकतो. भूक न लागणं संसर्ग झाल्यानंतर मुलांना सहसा भूक लागत नाही. त्यांच्या आवडीचे पदार्थही ते खात नाहीत. काही मुलांना अन्न खाल्ल्यानंतर उलट्याही होतात. नाक वाहतं नाक वाहणे किंवा नाकावर पुरळ येणे किंवा दुखणे हे देखील कोरोनाबाधित होण्याचं एक लक्षण आहे. अतिसार - पोटात गडबड होते, त्यामुळे वारंवार मल किंवा जुलाब सारखी समस्या होते. हे वाचा - यासाठी उन्हाळ्यात रात्रीसुद्धा अंघोळ करा; कित्येक प्रॉब्लेम्स होण्यापूर्वीच टाळा धाप लागणे - जर तुमच्या मुलाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तुम्ही त्याला ताबडतोब डॉक्टरांकडे घेऊन जा. शरीरात वेदना - अनेक मुले याबद्दल तक्रार करू शकत नाहीत, परंतु जर तुमच्या मुलाला वेदना होत असल्याते जाणवल्यास, उशीर करू नका आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. हे वाचा - घरात आनंदी वातावरण, स्ट्रेस होतो कमी; बेडरूममध्ये ही इनडोअर प्लांट्स लावून पाहा या गोष्टी लक्षात ठेवा - मुलांना आरोग्यदायी सवयी लावण्यास प्रवृत्त करावे. उदाहरणार्थ, मास्क घालणे, इतरांपासून 1 मीटरचे शारीरिक अंतर राखणे आणि वारंवार हात धुणे. मुले एकटे किंवा शाळेत असल्यास स्वतःची काळजी कशी घ्यावी हे शिकवा. व्हिटॅमिन सी भरपूर असलेल्या गोष्टी मुलांना द्या. उन्हाळ्यात मुलांना जास्त पाणी द्या. या ऋतूत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप गरजेचं असतं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona, Corona updates

    पुढील बातम्या