मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

कोरोनातून बरं झालेल्यांसाठी लशीचा एक डोस पुरेसा? अभ्यासानंतर शास्त्रज्ञांचं पंतप्रधानांना पत्र

कोरोनातून बरं झालेल्यांसाठी लशीचा एक डोस पुरेसा? अभ्यासानंतर शास्त्रज्ञांचं पंतप्रधानांना पत्र

कोरोनातून बरं झालेल्यांसाठी लसीचा (Corona Vaccine) एक डोसही पुरेसा आहे. अशा लोकांच्या शरीरात लसीचा पहिला डोस 10 दिवसाच्या आत अँटीबॉडी (Antibodies) तयार करतो.

  • Published by:  Kiran Pharate
लखनऊ 31 मे : बनारस हिंदू विश्वविद्यालय म्हणजेच BHUच्या शास्त्रज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासात असं समोर आलं आहे, की कोरोनातून बरं झालेल्यांसाठी लसीचा (Corona Vaccine) एक डोसही पुरेसा आहे. अशा लोकांच्या शरीरात लसीचा पहिला डोस 10 दिवसाच्या आत अँटीबॉडी (Antibodies) तयार करतो. या अँटीबॉडी कोरोनाविरोधातील लढ्यात अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. मात्र, ज्यांना आधी कोरोनाची लागण झालेली नाही अशात लोकांच्या शरीरात लसीकरणानंतर अँटीबॉडी तयार होण्यासाठी तीन ते चार आठवड्यांचा कालावधी लागतो. शास्त्रज्ज्ञांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) पत्र लिहित कोरोनातीन बरं झालेल्यांसाठी लशीचा एक डोसच अनिवार्य करण्याबाबतचा सल्ला दिला आहे. आतापर्यंत दोन कोटीहून अधिक लोक कोरोनातून बरे झाले आहेत. या सर्वांना लसीचा केवळ एकच डोस दिल्यास देशावरील लशीच्या तुटवड्याचं संकटही कमी होईल आणि अधिकाधिक लोकांना कमी वेळात लस देणं शक्य होईल. तुमच्या जिल्ह्यात निर्बंध वाढले की घटले, काय सुरू असणार, काय बंद? दैनिक भास्करनं दिलेल्या वृत्तानुसार, बीएचयूचे झुलॉजी विभागाचे प्रोफेसर ज्ञानेश्वर चौबे यांनी सांगितलं, की नुकतंच वीस लोकांवर एक पायलट स्टडी केली गेली. ही स्टडी कोरोनासाठी कारणीभूत असलेल्या SARS-CoV-2 विषाणूविरोधात नैसर्गिक अँटीबॉडीचा रोल आणि त्याच्या फायद्याची माहिती देते. स्टडीमध्ये असं समोर आलं, की कोरोना लसीचा पहिला डोस अशा लोकांमध्ये अगदी जलदगतीनं अँटीबॉडी तयार करतो, ज्यांना याआधीच कोरोनाची लागण झाली आहे. तर, ज्यांना कोरोना झालेला नाही, अशा लोकांमध्ये लस घेतल्यानंतर 21 ते 28 दिवसांनी अँटीबॉडी विकसित होतात. HBD: ‘आम्हाला कोरोनापासून वाचवं’; वीर दासनं केला देवाला फोन, पाहा VIDEO चौबे यांनी सांगितलं, की स्टडीमध्ये असंही समोर आलं आहे, की कोरोनातून बरं झाल्यानंतर काही दिवसातच अँटीबॉडीजही नष्ट होतात. भारत सध्या 70-80 कोटी लोकसंख्येचं लसीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. तर, दुसरीकडे भारत बायोटेक आणि सिरमची लस निर्मितीची क्षमता मोजकीच आहे. यामुळे स्टडीमध्ये समोर आलेल्या गोष्टी लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी उपयोगीच्या ठरणार असल्यानं याबाबत पंतप्रधानांना पत्र लिहिलं गेलं आहे.
First published:

Tags: Corona patient, Corona vaccine

पुढील बातम्या