Home /News /coronavirus-latest-news /

‘महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांमुळे पुन्हा कोरोना रुग्ण वाढले’, बंगळुरुच्या आयुक्तांचा आरोप

‘महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांमुळे पुन्हा कोरोना रुग्ण वाढले’, बंगळुरुच्या आयुक्तांचा आरोप

कर्नाटकची (Karnataka) राजधानी बंगळुरुमधील (Bengaluru) एका कॉलेजमध्ये मागील दोन दिवसांत 18 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळलं आहे. बंगळुरु महापालिका आयुक्तांनी यासाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना दोष दिला आहे.

    बंगळुरु, 28 फेब्रुवारी : देशात कोरोना रुग्णांची (COVID-19) संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे. महाराष्ट्र (Maharashtra) आणि केरळ (Kerala) या दोन राज्यांमध्ये याचं प्रमाण सर्वात जास्त आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर संचारबंदी, लॉकडाऊन हे उपाय सुरू झाले आहेत. त्याचवेळी शेजारच्या राज्यांनी त्यांच्या शहरातील वाढत्या रुग्णांसाठी महाराष्ट्राला जबाबदार धरलं आहे. कर्नाटकची (Karnataka) राजधानी बंगळुरुमधील (Bengaluru) एका कॉलेजमध्ये मागील दोन दिवसांत 18 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळलं आहे. बंगळुरुच्या आयुक्तांनी यासाठी शेजारच्या राज्यांना जबाबदार धरलं आहे. 'महाराष्ट्र आणि केरळ ही दोन आमची शेजारी राज्य आहेत. त्या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या दोन राज्यांमधील अनेक विद्यार्थी आमच्याकडे शिकायला येतात. त्यांची चाचणी करण्यात येणार असून त्यांचे विलगीकरण (isolation) करण्यात येईल', असं बंगळुरुचे महापालिका (BBMP) आयुक्त मंजुनाथ प्रसाद यांनी सांगितलं आहे. बंगळुरुमध्ये शुक्रवारी 367 नव्या कोरोना रुग्णांची संख्या आढळली असून त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर कर्नाटकात गेल्या 24 तासात 571 नवे कोरोना पेशंट्स आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार (the Health Ministry’s data) महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरात या सहा राज्यांमध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांमध्ये ती सर्वात जास्त आहे. महाराष्ट्रात शनिवारी 8,333 नवे रुग्ण आढळले. तर केरळमध्ये याच कालावधीमध्ये 3,671 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. (वाचा : Corona Vaccine: या लशीचा 1 डोस पुरेसा, रेफ्रिजरेटरमध्ये साठवण्याचा मार्गही मोकळा ) 1 मार्चपासून बदलणार नियम कोरोनाचा वाढता प्रसार पाहाता केंद्र सरकारने लसीकरणाच्या नियमांमध्ये बदल केला आहे. एक मार्चपासून देशव्यापी लसीकरणाला मोठ्या स्तरावर सुरुवात होत आहे, यात 60 वर्षापेक्षा अधिक वय असणारे नागरिक तसंच आधीपासून अन्य आजारांनी ग्रस्त असणाऱ्या 45 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांना आधी लस दिली जाणार आहे. लसीकरणाची मोहिम लवकरात लवकर राबवून कोरोनाची साखळी तोडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bengaluru, Corona hotspot, Corona virus in india, Covid19, India, Kerala, Maharashtra, School student

    पुढील बातम्या