'बर्थ डे'चं अनोखं 'गिफ्ट'! 14 वर्षीय मुलगी वाढदिवशीच झाली कोरोनामुक्त...

'बर्थ डे'चं अनोखं 'गिफ्ट'! 14 वर्षीय मुलगी वाढदिवशीच झाली कोरोनामुक्त...

राज्यात शहरांबरोबरच आता ग्रामीण भागात कोरोना व्हायरसची पकड आणखी घट्ट होत आहे.

  • Share this:

बीड, 27 मे: राज्यात शहरांबरोबरच आता ग्रामीण भागात कोरोना व्हायरसची पकड आणखी घट्ट होत आहे. बीड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या 47 वर पोहचली. एकीकडे भीतीच वातावरण असताना दुसरीकडं बीड जिल्हात दिलासादायक बातमी समोर आली.

हेही वाचा...राज्यपालांनी घेतला मोठा निर्णय, जारी केली अध‍िसूचना; या लोकांना मिळणार दिलासा

बीड जिल्हयात दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेवराई तालुक्यातील इटकूर येथील 14 वर्षीय कोरोनाबाधित मुलीला वाढदिवशीच अनोखं गिफ्ट मिळालं आहे. ही मुलगी कोरोनामुक्त झाली आहे. तिने वाढदिवशीच कोरोनावर मात केली आहे. तिचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तर माजलगाव तालुक्यातील हिवरा येथील एक तरुण देखील कोरोनोमुक्त झाला आहे. सर्वात आधी हे रुग्ण सिव्हिलमध्ये उपचार घेत होते. प्रदीर्घ काळानंतर या दोन्ही रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

विशेष म्हणजे 14 वर्षीय मुलीचा आज वाढदिवस आहे. या निमित्तानं प्रशासनाकडून पोलिस दलाच्या बॅंड पथकाकडून अनोखी सलामी देण्यात आली. रुग्णालय प्रशासनाकडून केक कापून त्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. बरे होणारे हे पहिलेच रुग्ण असल्याने रुग्णालयीन कर्मचारी, पोलिस, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत या रुग्णांना रग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली आहे.

हेही वाचा.. काँग्रेस लाचार, जनाची नाही.. मनाची असेल तर सत्तेबाहेर पडा, विखे पाटलांची टीका

दरम्यान, बीडमध्ये एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 55 वर पोहोचली आहे. एक्टिव्ह रुग्ण संख्या 45 आहे. आतापर्यंत 3 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 6 रुग्णांना पुढील उपचारासाठी पुणे येथील हॉस्पिटसमध्ये पाठवण्यात आलं आहे.

First published: May 27, 2020, 1:55 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading