कोरोनाविरोधात 130 औषधांचं ट्रायल; 'ही' दोन औषधं प्रभावी, तज्ज्ञांची माहिती

कोरोनाविरोधात 130 औषधांचं ट्रायल; 'ही' दोन औषधं प्रभावी, तज्ज्ञांची माहिती

कोरोनाव्हायरसविरोधात दोन औषधं प्रभावी ठरत असल्याची माहिती भारतातील तज्ज्ञांनी दिली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 मे : जगभरात कोरोनाव्हायरसचे 53 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. 3 लाखांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाव्हायरसविरोधात प्रभावी असं औषध नाही. मात्र इतर आजारांवरील औषधांचं ट्रायल कोरोनाविरोधात केलं जातं आहे. तब्बल 130 औषधांचं ट्रायल सुरू असून त्यापैकी  2 औषधं सर्वात प्रभावी असल्याची माहिती भारतातील तज्ज्ञांनी दिली आहे.

अमेरिकेतील थिंक टँक मिल्कन इन्स्टिट्युटच्या ट्रॅकरनुसार कोरोनाव्हायसवर उपचारासाठी 130 पेक्षा जास्त औषधांचं परीक्षण सुरू आहे. काही औषधांमध्ये व्हायरसला रोखण्याची क्षमता असू शकते. तर काही औषधं रोगप्रतिकारक शक्ती अतिसक्रिय होण्यापासून रोखू शकतात.

सीएसआयआरचे (Council of Scientific & Industrial Research - CSIR) राम विश्वकर्मा यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं, "कोरोनाव्हायरसविरोधात सध्या एक प्रभावी मार्ग आहे तो म्हणजे इतर आजारांवर उपचारासाठी मान्यता देण्यात आलेल्या औषधांचा कोरोनाव्हायरसवरील उपचारांसाठी प्रयोग. याचं एक उदाहरण म्हणजे रेमिडेसिवीर. या औषधामुळे लोकं लवकर बरे होण्यास मदत होत आहे. या औषधामुळे गंभीर रुग्णांचा मृत्यू होण्याचं प्रमाणही कमी झालं आहे. हे औषध जीवनरक्षक ठरू शकतं. फेविपिरावीर औषधदेखील आशादायक आहे"

हे वाचा - कोरोनामुळे रखडली लसीकरण मोहीम; लस न मिळाल्याने तब्बल 8 कोटी मुलांचा जीव धोक्यात

राम विश्वकर्मा म्हणाले, "सध्या तरी कोरोनाव्हायरसविरोधात नवीन औषध तयार करण्याइतपत पुरेसा वेळ आपल्याकडे नाही. नवीन औषध विकसित करण्यासाठी 5 ते 10 वर्षे लागू शकतात. त्यामुळे आपण सध्या जी औषधं उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करत आहोत. या औषधांचं क्लिनिकल ट्रायल घेऊन ही औषधं प्रभावी आहेत की नाहीत हे तपासत आहोत"

"एचआयव्ही आणि व्हायरल इन्फेक्शनवर उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या काही औषधांचा कोरोनाव्हायरसविरोधात वापर करून पाहता येऊ शकतो आणि जर ही औषधं प्रभावी ठरली तर औषध नियामक संस्थांची मान्यता घेऊन ही औषधं कोरोनाव्हायरसविरोधात उपचार म्हणून वापरता येऊ शकतात", असं विश्वकर्मा म्हणाले.

हे वाचा - जूनमध्ये होणार कोरोनाचा उद्रेक; टीबी तपासणीच्या मशीनने होणार कोरोना टेस्ट

First published: May 24, 2020, 8:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading