Home /News /coronavirus-latest-news /

कोरोनाव्हायरसपासून खरंच संरक्षण देतं का Arsenicum Album 30 होमिओपॅथी औषध?

कोरोनाव्हायरसपासून खरंच संरक्षण देतं का Arsenicum Album 30 होमिओपॅथी औषध?

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Arsenicum Album 30 या होमिओपॅथी औषधाचं वाटप सध्या सर्वत्र होताना दिसत आहे.

    मुंबई, 24 मे : कोरोनाव्हायरसविरोधात (coronavirus) कोणती लस नाही किंवा कोणतं प्रभावी औषध नाही. वेगवेगळ्या औषधांचं ट्रायल कोरोनाविरोधात केलं जात आहे. हायड्रोक्सिक्लोरोक्विन, रेमडेसिवीर अशा काही औषधांनंतर सध्या आर्सेनिक अल्बम 30 (Arsenicum Album 30) या होमिओपॅथी औषधाची (homeopathy medicine) सर्वत्र चर्चा आहे. नेमकं हे औषध नेमकं काय आहे? आणि ते कोरोनाव्हायरसविरोधात प्रभावी ठरू शकतं का? हे जाणून घेऊयात. आर्सेनिक अल्बम 30 हे औषध घेण्याचा सल्ला आयुष मंत्रालयानेच दिला आहे. सलग 3 दिवस रिकाम्या पोटी या औषधाचा एक डोस घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एका महिन्यानं पुन्हा असाच डोस घ्यावा असंही सांगण्यात आलं आहे. आयुष मंत्रालयाने प्रतिबंधात्मक म्हणून हे औषध घेण्याचा सल्ला दिल्यानंतर या औषधाकडे लोकांचा कल वाढू लागला. कोरोनाव्हायरसच्या परिस्थितीतही कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांना आणि त्यांच्या कुटुंबाला या औषधांचं वाटप करण्यात आलं, शिवाय स्थानिक लोकप्रतिनिधींनीदेखील या औषधाचं वाटप सुरू केलं. मात्र हेच औषध सध्या सर्वत्र का दिलं जातं आहे? हे वाचा - कोरोनापाठोपाठ कावासाकीचं संकट; आधी लहान मुलं आणि आता तरुणांनाही घातला विळखा नवी मुंबईतील होमिओपॅथी डॉक्टर तुषार बोरकर यांनी सांगितलं, "होमिओपॅथीचं एक औषध बऱ्याच आजारांवर काम करू शकतं. सध्या आर्सेनिक अल्बम 30 हे औषध चर्चेत आहे, कारण कोविड-19 ची लक्षणं आहेत, त्या लक्षणांवर प्रभावी असणारं हे औषध आहे. ही लक्षणं असलेले बहुतेक रुग्ण या औषधाला चांगली प्रतिक्रिया देत आहेत, असं दिसून आलं आहे. या औषधामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते" "आयुष मंत्रालयानेही हे औषध घेण्याचा सल्ला दिला आहे, त्यामुळे लहानांंपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण हे औषध घेऊ शकता. फक्त प्रतिबंधात्मक म्हणूनच नव्हे तर उपचार म्हणूनही हे औषध वापरता येऊ शकतं" संपादन - प्रिया लाड हे वाचा - कोरोनामुळे आपलेही झाले परके, 68 निराधार मृतदेहांवर योद्ध्याने केले अंत्यसंस्कार
    Published by:Priya Lad
    First published:

    पुढील बातम्या