मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

मंकीपॉक्सची लक्षणं आणि संसर्ग कमी होण्यासाठी ही दोन औषधे फायदेशीर; संशोधकांचा दावा

मंकीपॉक्सची लक्षणं आणि संसर्ग कमी होण्यासाठी ही दोन औषधे फायदेशीर; संशोधकांचा दावा

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Shutterstock)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Shutterstock)

कोरोना संसर्गानंतर मंकी पॉक्स या नवीन आजाराने जगभरात दहशत निर्माण केली आहे. यावर सध्या तरी ठोस औषध किंवा उपचार नाहीत. मात्र, आता लक्षणं दूर करण्यासाठी आणि संसर्गाचा कालावधी कमी करण्यासाठी दोन औषधं फायदेशीर ठरू शकतात, असं लॅन्सेट जर्नलने प्रसिद्ध केलेल्या ताज्या संशोधनात म्हटलं आहे.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 30 मे : जगातल्या काही देशांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मंकी पॉक्स (Monkeypox) या विषाणूजन्य आजाराचा (Viral Disease) संसर्ग वाढताना दिसत आहे. कोरोनानंतर मंकी पॉक्सचा संसर्ग वाढू लागल्याने जगभरात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं (World Health Organisation) सतर्कतेचा इशारा दिला आहे. भारतात अद्याप या विषाणूचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. या आजारावर अद्याप एकही औषध (Medicine) उपलब्ध नसून, लसही (Vaccine) तयार झालेली नाही; पण अलीकडेच उपचारांच्या अनुषंगाने आशेचा किरण एक नवा संशोधकांना दिसला आहे. मंकी पॉक्सची लक्षणं दूर करण्यासाठी आणि संसर्गाचा कालावधी कमी करण्यासाठी दोन औषधं फायदेशीर ठरू शकतात, असं लॅन्सेट जर्नलने प्रसिद्ध केलेल्या ताज्या संशोधनात म्हटलं आहे. याविषयीची माहिती देणारं वृत्त `टीव्ही नाइन हिंदी`ने प्रसिद्ध केलं आहे. मंकी पॉक्स या नव्या विषाणूजन्य आजाराचा काही देशांमध्ये मोठा प्रादुर्भाव दिसून आला आहे. हा आजार संसर्गजन्य असल्याने काळजी अधिकच वाढली आहे. सध्या तरी या आजारावर ठोस असं औषध किंवा लस उपलब्ध नाही. या आजारावर स्मॉल पॉक्ससाठी (Smallpox) वापरली जाणारी लस आणि अ‍ॅंटीव्हायरल औषधांच्या (Antiviral Medicine) मदतीने उपचार केले जात आहेत; मात्र लॅन्सेट जर्नलने नुकत्याच केलेल्या संशोधनातून दोन औषधांचा वापर मंकी पॉक्सची लक्षणं कमी करू शकतो, असं दिसून आलं आहे. मंकीपॉक्स झालेल्या 7 रुग्णांवर केलेल्या अभ्यासातून हा दावा करण्यात आला आहे. `डब्ल्यूएचओ`च्या (WHO) म्हणण्यानुसार, विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर 6 ते 13 दिवसांमध्ये मंकी पॉक्सची लक्षणं दिसू लागतात. काही वेळा लक्षणं दिसण्यासाठी 5 ते 21 दिवसांचा कालावधी लागू शकतो. संसर्ग झालेल्या दिवसापासून पाच दिवसांच्या आत ताप, डोकेदुखी, थकवा आणि पाठदुखीसारखी लक्षणं (Symptoms) दिसू लागतात. ताप येऊ लागल्यानंतर 1 ते 3 दिवसांत त्वचेवर त्याचा परिणाम दिसू लागतो आणि पुरळ येऊ लागतं. यात 95 टक्के रुग्णांमध्ये चेहऱ्यावर आणि 75 टक्के रुग्णांमध्ये हात आणि पायाच्या तळव्यांवर पुरळ येऊ लागतं. आता कोरोनाला रोखणं दूर नाही! 'IIT दिल्ली'तील संशोधनातून 'या' गोष्टी समोर 2018  ते 2021 दरम्यान ब्रिटनमध्ये (Britain) 7 रुग्णांना मंकी पॉक्सची लागण झाल्याचं दिसून आलं. त्यापैकी तीन जण पश्चिम आफ्रिकेतले होते. या रुग्णांना अ‍ॅंटीव्हायरल औषधं देण्यात आली. त्यामुळे त्यांची लक्षणं कमी झाली आणि संसर्गचा कालावधीदेखील कमी झाला. लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, रुग्णांवर ब्रिन्सीडोफोवीर (Brincidofovir) आणि टेकोव्हिरीमॅट (Tecovirimat) या दोन अ‍ॅंटीव्हायरल औषधाचा सकारात्मक परिणाम दिसून आला. `या औषधांच्या अनुषंगाने अधिक संशोधन होणं गरजेचं आहे,` असं शास्त्रज्ञ सांगतात. 'इंडियन एक्सप्रेस'च्या वृत्तानुसार, संशोधन करताना कोणत्याही रुग्णातली मंकी पॉक्सची लक्षणं गंभीर बनली नाहीत. या रुग्णांना न्यूमोनिया झाला नाही किंवा संसर्गामुळे अवयवाचं कार्य बिघडून जीवघेणी स्थिती अर्थात सेप्सिसची स्थिती निर्माण झाली नाही. त्यामुळे या औषधांचा हा सकारात्मक परिणाम असावा, हे नाकारून चालणार नाही. पुढील टप्प्यात यावर अधिक संशोधन करून जास्तीत जास्त माहिती मिळवता येऊ शकते. डिस्काऊंटच्या नादात दातांवर उपचारासाठी परदेशात गेली; तोंड उघडताच हादरली महिला जगभरातल्या डॉक्टर्सना या आजारावर उपचारांची दिशा ठरवण्यासाठी हे संशोधन नक्कीच सहायक ठरू शकतं. मंकी पॉक्सची लक्षणं 2 ते 4 आठवड्यांपर्यंत दिसू शकतात. लहान मुलांमध्ये हा आजार गंभीर स्वरूपात दिसून येतो. विषाणूचा परिणाम आणि रुग्णाची प्रकृती यावर संसर्गाचा परिणाम किती गंभीर होईल हे ठरतं. त्यामुळे ही दोन औषधं मंकीपॉक्सवर उपचारासाठी आशेचा नवा किरण ठरू शकतात, असं म्हणता येईल.
First published:

Tags: Viral news

पुढील बातम्या