मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

आता 5 वर्षाखालील मुलांच्या मातांनाही मिळणार Corona Vaccine, संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्णय

आता 5 वर्षाखालील मुलांच्या मातांनाही मिळणार Corona Vaccine, संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्णय

राज्य सरकारनं असा निर्णय घेतला आहे, की बाळाचं वय ५ वर्षापेक्षा कमी असलेल्या सर्व मातांना लस (Vaccination of all Mothers Having Children Under 5 Years of Age) देण्यात येणार आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका पाहता राज्य सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 08 जून : कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर या विषाणूसोबत लढण्यासाठी लसीकरण हे एक महत्त्वाचं शस्त्र मानलं जात आहे. त्यामुळे, अधिकाधिक लोकांचं लसीकरण वेगानं करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. 1 मेपासून 18 वर्षावरील सर्वांना कोरोना लस देता येणार असल्याचं केंद्र सरकारनं याआधीच जाहीर केलं आहे. मात्र, लहान मुलांच्या माता म्हणजेच बाळांना स्तनपान कऱणाऱ्या महिलांना लस देण्यात ये नव्हती. अशात आता आंध्र प्रदेश सरकारने मोठी घोषणा केली आहे.

परदेशात जाण्याची तयारी करताय! आधी मोदी सरकारचे हे नवे नियम वाचा

राज्य सरकारनं असा निर्णय घेतला आहे, की बाळाचं वय ५ वर्षापेक्षा कमी असलेल्या सर्व मातांना लस (Vaccination of all Mothers Having Children Under 5 Years of Age) देण्यात येणार आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका पाहता राज्य सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कारण, तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता अनेकांनी वर्तवली आहे, तर काही स्टडीजमधून असं समोर आलं आहे, की कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलं हे वाहक बनतील. याच पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशचे वैद्यकीय व आरोग्य प्रधान सचिव अनिल कुमार सिंघल यांनी ही घोषणा केली आहे.

थांबा, घाई करू नका! कोरोनाच्या मोठ्या धोक्याबाबत WHO ने भारताला केलं सावध

अनिल कुमार सिंघल यांनी याबाबत बोलताना सांगितलं, की मुख्यमंत्र्यांच्या निरीक्षणात असं समोर आलं आहे, की लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या मातादेखील त्यांच्यासोबतच रुग्णालयात थांबतात. अशा जवळपास 20 लाख माता असल्याचं सांगत 45 वर्षावरील वयोगटातील व्यक्तींसोबतच या महिलांचं लसीकरण करण्यात येईल, अशी माहिती राज्या सरकारनं दिली आहे.

First published:

Tags: Corona vaccination, Corona vaccine, Corona virus in india