Home /News /coronavirus-latest-news /

धक्कादायक! अंदमान-निकोबारमधील दुर्मीळ जमातीची लोकसंख्या 53, पैकी 4 जणं कोरोना पॉझिटिव्ह

धक्कादायक! अंदमान-निकोबारमधील दुर्मीळ जमातीची लोकसंख्या 53, पैकी 4 जणं कोरोना पॉझिटिव्ह

अंदमान-निकोबारमध्येही कोरोनाचा शिरकाव झाल्याने चिंता वाढली आहे.

    नवी दिल्ली, 27 ऑगस्ट : भारतातील अंदमान-निकोबार बेटावरील अतिदूर्गम समूहातील 4 सदस्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. ग्रेट अंदमानीज जनसमूहातील 4 सदस्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय दोघांना एका कोविड सेंटरमध्ये आयसोलेट करण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार कोरोना संक्रमण झालेले लोक ज्या समुदायाचा भाग आहे, त्याचे केवळ 53 लोक जिवंत असल्याची बाब समोर आली आहे. हे लोक अंदमान-निकोबाद बेटावरील एका रिहाइशी आयलँडचे रहिवासी आहेत. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना संसर्ग झालेल्यांची तब्येत सध्या स्थिर आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या चाचणीनंतर समोर आली माहिती सांगितले जात आहे की, अंदमान निकोबार बेटाच्या पूर्वेकडील भागात आतापर्यंत कोरोना व्हायरस संसर्गातील 2985 केसेस दाखल करण्यात आले आहे.  येथे पहिली केस जून महिन्यात दाखल करण्यात आली होती. ग्रेट अंदमानीज समुदायाच्या लोकांना संसर्ग झाल्याची बाब काही दिवसांपूर्वी 53 लोकांच्या चाचणीनंतर समोर आली. हे ही वाचा-142 दिवसांनंतर पुन्हा कोरोनाची लागण; धक्कादायक कारणं आली समोर, संशोधकही हैराण तर दुसरीकडे देशातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या संख्येनं वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 75 हजार 760 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर, एकाच दिवसात सर्वाधिक 1023 रुग्णांचा मृत्यू झाला. याआधी भारतात 22 ऑगस्ट रोजी सर्वाधिक 69 हजार 878 रुग्णांची नोंद झाली आहे. पहिल्यांदाच देशातील कोरोना रुग्णांची संख्या 75 हजार पार झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या 7 लाख 25 हजार 99 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, 25 लाख 23 हजार 772 रुग्ण निरोगी झाले आहेत. तर, 60 हजार 472 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या