नवी दिल्ली, 7 फेब्रुवारी : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनानंतर संपूर्ण देशात शोक व्यक्त केला जात आहे. कलाविश्वाससह, क्रिकेट, राजकीय अशा सर्वच स्तरातून संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त होतेय. उद्योग जगतातही अनेकांनी लता दीदींच्या जाण्याने दु:ख व्यक्त केलंय. याचदरम्यान आनंद महिंद्रांनी (Anand Mahindra) ट्विट करत कोरोनाचा तिरस्कार, द्वेष करत असल्याचं म्हटलं आहे.
लता दीदींच्या जाण्याने आनंद महिंद्रा यांनी शोक व्यक्त करत एक ट्विट केलं आहे. 'कोरोना जाता जाता तु अतिशय वाईट केलंस. आमचा आवाज घेऊन गेलास. मी तुझा तुरस्कार, द्वेष करतो' अशा आषयाचं ट्विट करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
लता मंगेशकर यांनी कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचारादरम्यान वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर काल संध्याकाळी मुंबईच्या शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने देशात दोन दिवसांच्या दुखवटा जाहीर केला. लता दीदींच्या निधनानंतर महाराष्ट्र राज्य सरकारने सरकारी सुट्टी जाहीर केली आहे.
कोविड, जाते जाते तुमने अपना सबसे बुरा किया। हमारी आवाज चुरा ली। मुझे तुमसे नफ़रत है। pic.twitter.com/oTLsF08nXN
— anand mahindra (@anandmahindra) February 6, 2022
लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी शिवाजी पार्क परिसरात हजारोंचा जनसागर लोटला होता. प्रचंड शोकाकुल वातावरणात साश्रू नयनांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून यावेळी लतादीदींना पुष्पचक्र अर्पन करण्यात आलं.
लता मंगेशकर यांना 8 जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर गेल्या 27 दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. या दरम्यान त्यांनी कोरोनावर मात केली होती. त्यांची प्रकृती बरी होण्याच्या मार्गावर होती. पण शनिवारी (5 फेब्रुवारी) अचानक पुन्हा त्यांची प्रकृती खालावली. डॉ. प्रतीत सामदानी यांची टीम त्यांच्यावर ICU मध्ये उपचार करत होती. पण रविवारी सकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास लतादीदींची प्राणज्योत मालवली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anand mahindra, Corona virus in india, Lata Mangeshkar - लता मंगेशकर