Home /News /coronavirus-latest-news /

‘नॉटी गर्ल’वरून अमृता फडणवीसांचा राऊतांवर निशाणा!

‘नॉटी गर्ल’वरून अमृता फडणवीसांचा राऊतांवर निशाणा!

अमृता फडणवीस यांनी या आधीही सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली होती. त्यावरून बरीच चर्चाही झाली होती.

    मुंबई 07 सप्टेंबर: मुंबई पोलिसांवर अभिनेत्री कंगना रणौतने केलेल्या वक्तव्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कंगनाला हरामखोर हा शब्द वापरला होता. त्याचं स्पष्टीकरण त्यांनी सोमवारी दिलं. अभिनेत्री कंगना रणौत म्हणजे नॉटी गर्ल आहे असं म्हणत त्यांनी हरामखोर या शब्दाचा अर्थही उलगडून सांगितला आहे. त्यांच्या या स्पष्टिकरणावर अमृता फडणवीस यांनी राऊतांचं नाव न घेता निशाणा साधला आहेत. आम्ही विचार केला त्यापेक्षाही जास्त खट्ट्याळ आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे. अमृता फडणवीस यांनी या आधीही सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली होती. त्यावरून बरीच चर्चाही झाली होती. दरम्यान, या प्रकरणात राऊत यांनी हरामखोर या शब्दाचा अर्थही उलगडून सांगितला आहे. आतापर्यंत कंगनावर सडेतोड टीका करणारे संजय राऊत म्हणाले, अभिनेत्री कंगना रणौत म्हणजे नॉटी गर्ल आहे. राऊत पुढे म्हणाले, हरामखोर म्हणजे मराठी भाषेत बेईमान असा होतो. ती नॉटी म्हणजे खट्याळ मुलगी आहे आणि बेईमान आहे. असं मला वाटतं असं आता संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. काही दिवसांपूर्वीच कंगनाने मुंबई ही पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते असं ट्विट केलं होतं. त्यानंतर कंगना आणि संजय राऊत यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू होते. त्यात संजय राऊत यांनी कंगनाला मुंबईला येऊ नको, असा सल्ला दिला होता. यावर कंगनाने मुंबई कोणाच्या बापाची नसल्याचे सांगत 9 सप्टेंबर रोजी मुंबईत येणार असल्याचं सांगितलं होतं. यानंतर कंगनाला सुरक्षा देण्याचं आवाहन विविध नेत्यांकडून केलं जात होतं. त्यातच गृहमंंत्रालयाने कंगनाला Y दर्जाची सुरक्षा देणार असल्याचे सांगितले आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Sanjay raut

    पुढील बातम्या