CBSE बोर्डाच्या बारावीच्या परीक्षाही होणार रद्द? कोरोनाच्या सावटाखाली विद्यार्थ्यांचं भविष्य

CBSE बोर्डाच्या बारावीच्या परीक्षाही होणार रद्द? कोरोनाच्या सावटाखाली विद्यार्थ्यांचं भविष्य

Coronavirus in India: सीबीएसई बोर्डाची (CBSE Board) बारावीची परीक्षा देखील कोरोनाच्या सावटाखाली आहे. देशात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता ही परीक्षा देखील रद्द केली जावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 मे: कोरोनाच्या सावटामुळे (Coronavirus in India) देशातील विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलं आहे. देशातील महत्त्वाच्या अशा परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत तर काही परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सीबीएसई बोर्डाची (CBSE Board) बारावीची परीक्षा देखील कोरोनाच्या सावटाखाली आहे. देशात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता ही परीक्षा देखील रद्द केली जावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान बोर्डाकडून अजून आठवडे तर सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती मिळते आहे. त्यानंतर पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा घ्यायच्या की रद्द करायच्या याबाबत निर्णय घेतला जाईल. शिक्षण मंत्रायलातील सूत्रांच्या हवाल्याने टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

मीडिया अहवालानुसार, परीक्षा रद्द करून असेसमेंट आधारीत योजना विद्यार्थ्यांसाठी आखली जाण्याची शक्यता आहे. शिक्षण मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे.

हे वाचा-वाईटातून चांगलं घडल्याचा प्रकार! कोरोना झाल्यानं दोन माओवाद्यांनी केलं आत्मसमर्प

सध्याची कोरोनाची परिस्थिती आधीपेक्षा चारपट वाईट आहे, अशी प्रतिक्रिया सीबीएसईच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यांच्या मते या शैक्षणिक सत्रासाठी शाळा बंदच राहतील. परीक्षांबाबत अंतिम निर्णय एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जूनमध्ये घेतला जाईल. सध्याच्या परिस्थितीत परीक्षा होण्याची शक्यता कमी असल्याचंही ते म्हणाले.

मीडिया अहवालानुसार कोरोना काळात CBSE बोर्डाच्या परीक्षा घ्याव्या की नाहीत याबाबत शिक्षण तज्ज्ञांमध्ये दुमत आहे. देशातील काही महत्त्वाच्या शिक्षण संस्थांमधील अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, कोरोनाची परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जूनमध्ये देखील या परीक्षा होण्याची शक्यता धूसर आहे. अशावेळी परीक्षा रद्द करण्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक नाही आहे. तर काही तज्ज्ञांच्या मते जरी आणखी सहा महिने थांबावं लागलं तरी चालेल तरी परीक्षा होणं गरजेचं आहे. CBSE चे माजी चेअरपर्सन अशोक गांगुली यांच्या मते ही परिस्थिती निश्चितच सुधारेल आणि आपण जुलैमध्ये बारावीच्या परीक्षा घेऊ शकतो.

हे वाचा-देशात कोरोनाची दुसरी लाट येतीये आटोक्यात! रुग्णसंख्येत घट तर रिकव्हरी रेट वाढला

काही शिक्षण तज्ज्ञांच्या मते ऑनलाइन परीक्षा हा देखील एक पर्याय आहे. दरम्यान हा काळ विद्यार्थी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तणावाखाली असणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्ग दाखवण्याचं काम पालकांनी करणं अपेक्षित आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: May 14, 2021, 8:39 AM IST

ताज्या बातम्या