मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

जिव्हाळा! कोरोना काळात लाडक्या शिक्षकासाठी धावून आले माजी विद्यार्थी; एक मेसेज आणि 25 लाख रुपये झाले जमा

जिव्हाळा! कोरोना काळात लाडक्या शिक्षकासाठी धावून आले माजी विद्यार्थी; एक मेसेज आणि 25 लाख रुपये झाले जमा

तब्येत बिघडल्यानंतर या शिक्षकाला रुग्णालयात दाखल केलं. शिक्षकाच्या उपचारासाठी पैशांची कमतरता भासत होती. त्यामुळे त्यांच्या मुलाने एका ग्रुपवर फक्त एक मेसेज टाकला आणि 1489 जणांनी त्यांच्या खात्यावर केवळ चारच दिवसात 25 लाख 70 हजार रुपये जमा केले.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk
पाटणा (मध्य प्रदेश), 2 मे : शिक्षक-विद्यार्थ्यांचं नातं अतूट असतं, शिक्षण घेतलेल्या प्रत्येकाच्या मनात किमान एका तरी शिक्षकाविषयी कमालीचा आदर असतो. त्यांनी कधी हाक दिली तर आपण त्यांच्या मदतीला नक्की साद देतो. काही शिक्षक असे असतात त्यांच्या शिकवण्याचा, मूल्यशिक्षणाचा आपल्यावर खूप प्रभाव होत असतो. त्यातून काही विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलून जाते. मग अशा शिक्षकांविषयी आपल्या मनात नेहमीच आस्था असते. या कोरोनाच्या (Corona in India) परिस्थितीत अशाच एका इंदूरमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांची अनोखी कहाणी समोर आली आहे. एका शिक्षकाच्या मुलाने त्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केलं. या शिक्षकाच्या उपचारासाठी पैशांची कमतरता भासत होती. त्यामुळे त्यांच्या मुलाने एका ग्रुपवर फक्त एक मेसेज टाकला आणि 1489 जणांनी त्यांच्या खात्यावर केवळ चारच दिवसात 25 लाख 70 हजार रुपये जमा केले. हे पैसे पाठवणारे सर्वजण या शिक्षकाचे माजी विद्यार्थी आहेत. अनेकांनी नावे जाहीर न करण्यास सांगितले बहुतेकांनी त्यांची नावेही सांगितली नाहीत. केवळ शिक्षकाचा हितचिंतक असे म्हणून रक्कम खात्यावर हस्तांतरित केली. 10 रुपयांपासून काहींनी आपल्या प्रिय शिक्षकांसाठी एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम पाठविली. माजी विद्यार्थ्यांमध्ये आपल्या वडिलांविषयी असलेले हे प्रेम पाहून मुलगा आश्चर्यचकित झाला. वडिलांवर उपचार सुरू आहेत. त्यांच्या फुफ्फुसांवर 80 टक्क्यांहून अधिक कोरोना संसर्ग झाला आहे. त्यांना एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये दाखल केले आहे आणि बाहेर त्यांचे हितचिंतक प्रार्थना करीत आहेत, असे त्यांच्या मुलाने सांगितले. हे वाचा - Corona: नाईट, विकेण्ड कर्फ्यूचा उपयोग नाही, देशात कडक लॉकडाऊनची गरज; जाणकारांनी सांगितलं कारण हे वाचा - Assembly Election 2021: ममता बॅनर्जींवरील हल्ल्यापासून टेप लीकपर्यंत, पश्चिम बंगाल निवडणुकीतील 5 प्रमुख वाद मुलाने सांगितली कोरोनाची कहाणी 16 एप्रिल रोजी वडिलांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. 18 तारखेला आम्ही कुटुंबातील सर्वांनी कोरोना चाचणी (Corona Testing) केली असता वडिलांसह आम्ही सर्वच पॉझिटिव्ह आलो. वडिलांना 20 एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मीदेखील रुग्णालयात भर्ती झालो. काही दिवसांत मी ठीक झालो, पण वडिलांची तब्येत खालावत होती आणि उपचारासाठी खूप पैशांची गरज होती. त्यांचा संसर्ग वाढत होता आणि उपचारासाठी बरीच औषधे लागत होती. वडील गेली 20 वर्षे शिक्षक आहेत. आमचे मध्यमवर्गीय कुटुंब आहे. मीही अजून शिक्षण घेत आहे. यादरम्यान माझ्या वडिलांच्या विद्यार्थ्यांनी आणि माझ्या कॉलेजमधील मित्रांनी वडिलांच्या मदतीसाठी एक संदेश तयार करून सोशल मीडियावर अपलोड केला. त्यानंतर चार ते पाच दिवसातच वडिलांसाठी मेसेजेस येऊ लागले आणि पैसेही जमा होऊ लागले. आम्हाला फक्त 10-12 लाखांची गरज होती. मात्र, याहून जादा रक्कम जमा झाली. आम्ही आता हा संदेश दिला आहे की, रक्कम दान करू नका, बरेच पैसे जमा झाले आहेत. मात्र, तरीही काहीजण पैसे पाठवतच राहिले. आम्ही आता उरलेली रक्कम गरजू कोरोना पीडितांसाठी खर्च करणार आहे, असे त्यांच्या मुलाने सांगितले.
First published:

Tags: Corona updates, Corona virus in india, Indore, Indore News

पुढील बातम्या