कोणती कोरोना लस चांगली? कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन की स्पुटनिक व्ही... जाणून घ्या लशींबद्दल सर्व काही

कोणती कोरोना लस चांगली? कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन की स्पुटनिक व्ही... जाणून घ्या लशींबद्दल सर्व काही

Corona Vaccination बद्दल तुमच्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं.. कुठली लस चांगली, किंमत किती, कधी घ्यावी लशींविषयी सर्व काही...

  • Share this:

नवी दिल्ली, 4 मे: कोरोनाचा संसर्ग (Corona Vaccine) थांबवण्यासाठी एक मेपासून लसीकरण (Vaccination Drive) 18 वर्षांवरच्या सर्वांना सुरू करण्यात आलं आहे. लशींचा पुरेसा साठा नसल्यामुळे अनेक राज्यांत या वयोगटाचं लसीकरण उशिरा सुरू होणार आहे. तरीही तोपर्यंत उपलब्ध लशींबद्दलची सर्व प्रकारची माहिती करून घेणं आवश्यक आहे. कोव्हॅक्सिन (Covaxin) आणि कोविशिल्ड (Covishield) या दोन लशी 16 जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरण कार्यक्रमात भारतात वापरल्या जात आहेत. आता रशियाची स्पुटनिक व्ही (Sputnik V) ही लसदेखील वापरली जाणार आहे. सर्व लशी प्रभावी असल्याचं चाचण्यांमध्ये आढळलं असल्यामुळे जी लस मिळेल, ती घ्या आणि कोरोनाची तीव्रता कमी करा, असा सल्ला शास्त्रज्ञ देत आहेत. आपण या लशींबद्दलची अधिक माहिती घेऊ या.

तीनपैकी कोणती लस चांगली?

- तिन्ही लशी चांगल्या आहेत. कोव्हॅक्सिन ही भारत बायोटेक (Bharat Biotech), आयसीएमआर (ICMR) आणि एनआयव्ही (NIV) या संस्थांनी पूर्णतः भारतातच तयार केलेली लस आहे. कोविशिल्ड ही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी (Oxford University) आणि अॅस्ट्राझेनेका (Astrazeneca) यांनी विकसित केलेली लस पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) या कंपनीत उत्पादित केली जात आहे.

कोरोनातून बरं झाल्यानंतर करा 'या' चाचण्या, शरीरात झालेल्या बदलांची मिळेल माहिती

एक मे रोजी रशियातून स्पुटनिक व्ही ही लसदेखील भारतात दाखल झाली आहे. ही लस मॉस्कोच्या गामालेय रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिऑलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी या संस्थेने विकसित केली आहे. त्यासाठी रशियन डेव्हलपमेंट अँड इन्व्हेस्टमेंट फंडची (RDIF) मदत घेण्यात आली आहे. हैदराबादच्या डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीच्या (Dr. Reddy's Laboratory) मार्गदर्शनाखाली भारतात सहा कंपन्या या लशीचं उत्पादन करत आहेत. सुरुवातीला सव्वा कोटी डोस आयात केले जाणार आहेत.

VIDEO: 'इथून निघ'; लस घेताना तरुणीनं घातला भलताच गोंधळ, डॉक्टरही वैतागले

तिन्ही लशींमध्ये काही फरक आहेत आणि प्रत्येकीचे काही वेगळे फायदेही आहेत. कोविशिल्ड ही जगात सर्वांत लोकप्रिय असलेली लस असून, सर्वाधिक देशांत ती वापरली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही या लशीला मान्यता दिली आहे. कोव्हॅक्सिन ही लस केवळ भारतातच वापरली जात असून, कोरोनाच्या म्युटंट स्ट्रेन्सवरही ती प्रभावी ठरत असल्याचं आढळून आलं आहे. स्पुटनिक व्ही या लशीला भारतासह 60हून अधिक देशांत मान्यता मिळाली आहे.

या लशी कशा विकसित करण्यात आल्या आहेत?

- कोव्हॅक्सिन ही लस पारंपरिक इनअॅक्टिव्हेटेड प्लॅटफॉर्मवर (Inactivated Platform) तयार करण्यात आली आहे. म्हणजेच यातून मृत व्हायरस शरीरात सोडला जातो. त्यातून अँटीबॉडी प्रतिसादाला चालना मिळते. विषाणू ओळखून त्याला विरोध करण्यासाठी अँटीबॉडी तयार केल्या जातात.

कोविशिल्ड हे व्हायरल व्हेक्टर व्हॅक्सिन (Viral Vector Vaccine) आहे. चिम्पांझीमध्ये आढळणाऱ्या ChAD0x1 या अॅडेनोव्हायरसचा वापर करून ही लस तयार करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना विषाणूप्रमाणे दिसणारं स्पाइक प्रोटीन तयार होतं. त्यामुळे ते शरीरात गेल्यावर संरक्षणक्षमता जागृत होते.

कोरोनाचा वेग वाढतोय तर लसीकरणाचा घटतोय, आतापर्यंत किती जणांना मिळाली Vaccine?

स्पुटनिक व्ही हेदेखील व्हायरल व्हेक्टर व्हॅक्सिनच आहे; फक्त ते दोन विषाणूंच्या साह्याने विकसित करण्यात आलेलं आहे. या लशीचे दोन्ही डोसेस वेगवेगळे असतात. कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या लशींचे दोन्ही डोसेस सारखेच असतात.

किती डोस आणि किती कालावधीने घेणं आवश्यक?

- या तिन्हींपैकी कोणतीही लस घेतली, तरी पुरेशी प्रतिकारशक्ती विकसित (Immunity) होण्यासाठी दोन डोसेस घेणं आवश्यक आहे. या लशी इंट्रामस्क्युलर (Intramuscular)अर्थात स्नायूमध्ये दिल्या जातात. त्या हातावर खांद्याजवळ दिल्या जातात.

कोव्हॅक्सिन लशीचे दोन डोस चार ते सहा आठवड्यांच्या अंतराने घ्यावेत. कोविशिल्डच्या दोन डोसेसमध्ये सहा ते आठ आठवड्यांचं अंतर असावं. तसंच, स्पुटनिक व्ही या लशीच्या दोन डोसेसमध्ये तीन आठवड्यांचं अंतर असणं गरजेचं आहे.

कोरोनातून बरे झालेल्यांसाठी लसीचा एक डोसही पुरेसा? वाचा काय सांगतात अभ्यासक

भारतात सुरुवातीला कोविशिल्डच्या दोन डोसेसमध्ये चार ते सहा आठवड्यांचं अंतर ठेवलं जात होतं. परंतु, चाचण्यांमध्ये असं लक्षात आलं, की या लशीच्या दोन डोसेसमध्ये आणखी जास्त दिवसांचं अंतर ठेवलं, तर ती अधिक प्रभावी ठरते.

या तिन्ही लशी भारतातल्या उपलब्ध सुविधांमध्ये साठवता येतात. त्या लशींची साठवणूक दोन ते आठ अंश सेल्सिअस तापमानात करता येते. अमेरिकेसह अनेक देशांमध्ये फायझर (Pfizer) आणि मॉडर्ना कंपनीच्या (Moderna) मेसेंजर आरएनए तंत्रज्ञानावर (m-RNA) आधारित विकसित करण्यात आलेल्या लशींची साठवणूक उणे 70 अंश सेल्सिअस एवढ्या प्रचंड थंड तापमानात करावी लागते.

लशी किती प्रभावी आहे?

- या तिन्ही लशी प्रभावी आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ठरवून दिलेले सर्व निकष त्या पूर्ण करतात. तथापि क्लिलिनकल ट्रायल्सची माहिती अजूनही हाती येत आहे. त्यामुळे त्या माहितीचं विश्लेषण सातत्याने केलं जात असून, प्रभाव तपासला जात आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात कोविशिल्ड लशीची चाचणी संपली. ती 70 टक्के प्रभावी आहे. तसंच, दोन डोसेसमधलं अंतर वाढवलं, तर तिचा प्रभाव आणखी वाढत असल्याचं आढळलं आहे. ही लस गंभीर लक्षणांपासून बचाव करते आणि बरं होण्याचा कालावधीही कमी करते.

कोव्हॅक्सिन या लशीच्या चाचण्या याच वर्षी झाल्या. एप्रिल महिन्यात या लशीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांचे निष्कर्ष हाती आले. त्यानुसार ही लस 78 टक्के प्रभावी असल्याचं आढळलं आहे. तसंच, गंभीर लक्षणं आणि मृत्यू रोखण्यात ही लस 100 टक्के प्रभावी असल्याचं आढळलं आहे.

स्पुटनिक व्ही ही रशियन लस सर्वांत जास्त म्हणजे 91.6 टक्के प्रभावी ठरत असल्याचं आढळलं आहे. त्याखालोखाल मॉडर्ना आणि फायझर यां कंपन्यांच्या एम-आरएनए लशी किमान 90 टक्के प्रभावी असल्याचं आढळलं आहे.

उपलब्धता आणि किंमत

- कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या लशी लवकरच खुल्या बाजारपेठेतही उपलब्ध होतील. राज्य सरकारंही बाजारपेठेतून विकत घेऊन या लशी वापरू शकतात. स्पुटनिक व्ही ही लसही लवकरच बाजारपेठेत उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीने कोविशिल्ड ही लस सरकारी हॉस्पिटल्सना 300 रुपये प्रति डोस या दराने, तर खासगी हॉस्पिटल्सना 600 रुपये प्रति डोस या दराने देणार असल्याचं जाहीर केलं आहे. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस थोडी महाग आहे. ती राज्य सरकारांना 400 रुपये प्रति डोस या दराने, तर खासगी हॉस्पिटल्सना 1200 रुपये प्रति डोस या दराने उपलब्ध होणार आहे.

स्पुटनिक व्ही लस विकसित करणाऱ्या संस्थांपैकी एक असलेल्या RDIFचे प्रमुख दिमित्रेव्ह यांनी दिलेल्या माहितीनुसार या लशीच्या एका डोसची किंमत 10 डॉलर म्हणजे सुमारे 700 रुपये असेल. सरकार आणि खासगी हॉस्पिटल्सना ही लस किती रुपये दराने उपलब्ध होणार, हे अद्याप कंपनीने जाहीर केलेलं नाही.

अर्थात, हे सगळं असलं, तरी तुम्ही कुठे लस घेताय आणि त्या राज्यात सरकारी धोरणं नेमकं काय आहे, यानुसार तुम्हाला लशीची किंमत मोजावी लागेल. आतापर्यंत 24 राज्यांनी असं जाहीर केलं आहे, की 18 वर्षांवरच्या वयोगटासाठी लस मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे.

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट्सवर या लशी किती प्रभावी आहेत?

- जगातल्या अनेक देशांमध्ये आता कोरोना विषाणूच्या नव्या, म्युटंट स्ट्रेन्स (coronavirus Mutant Strains) आढळत आहेत. ब्रिटनमध्ये केंट स्ट्रेन आहे. भारतात डबल म्युटंट स्ट्रेन आहे. हा स्ट्रेन ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेतल्या स्ट्रेनच्या संगमातून नव्याने तयार झाली आहे. काही देशांत ट्रिपल म्युटंट विषाणूही आढळला आहे. या म्युटंट्समुळे शास्त्रज्ञांची डोकेदुखी वाढली आहे. आतापर्यंतच्या संशोधनात असं आढळलं आहे, की कोव्हॅक्सिन ही लस सर्व प्रकारच्या म्युटंटवर प्रभावी ठरत आहे.

कोविशिल्ड आणि स्पुटनिक व्ही या लशींबद्दलच्या संशोधनातून अशा प्रकारचा कोणताही दावा आतापर्यंत करण्यात आलेला नाही. तरीही शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे, की आपल्याकडे जी कोणती लस उपलब्ध होईल, ती घ्यावी. त्याद्वारेच आपण नव्या म्युटंट स्ट्रेनचा प्रसार रोखू शकतो.

या लशींचे साइड इफेक्ट्स कोणते आहेत?

या तिन्ही प्रकारच्या लशींचे साइड-इफेक्ट्स सारख्याच प्रकारचे आहेत. या लशी इंट्रामस्क्युलर असल्याने स्नायूत खोलवर टोचाव्या लागतात. त्यामुळे लस जिथे दिली जाते, तिथे वेदना होतात आणि सूज येऊ शकते. सौम्य ताप, अंगदुखी, थोडी सर्दी अशी लक्षणं सर्वसामान्यपणे दिसू शकतात. अशी लक्षणं दिसल्यास काळजीचं कारण नाही. डॉक्टरांशी चर्चा करून औषध घेतल्यावर बरं वाटेल.

कोणी लस घेऊ नये?

एखाद्या व्यक्तीला काही खाद्यपदार्थांची किंवा औषधांची अॅलर्जी असेल, तर त्यांनी थेट लस घेऊ नये. आधी आपल्या डॉक्टरांशी चर्चा करावी आणि त्यांच्या सल्ल्यानंतरच लस घ्यावी. तसंच, लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर काही गुंतागुंत निर्माण झाली, तर दुसरा डोस डॉक्टरांशी चर्चा करण्यापूर्वी घेऊ नये.

Explainer : सौम्य-लक्षणं नसणाऱ्या रुग्णांनी होम आयसोलेशनमध्ये कशी काळजी घ्याल?

ज्यांनी मोनोक्लोनल अँटीबॉडी (Monoclonal Antibody) किंवा प्लाझ्मा थेरपी (Plasma Therapy) घेतली असेल, त्यांनीही सध्या लस घेऊ नये. ज्यांच्या शरीरात प्लेटलेट्सचं प्रमाण कमी आहे किंवा ज्यांनी स्टेरॉइड ट्रीटमेंट घेतली आहे, त्यांनी लस घेतल्यानंतर वैद्यकीय निरीक्षणाखाली राहावं, असा सल्ला दिला जात आहे. 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे तरुण, गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांनीही लस न घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसंच, ज्यांना कोरोनाची लक्षणं दिसत आहेत किंवा कोरोनातून पूर्ण बरे झालेले नाहीत, अशा व्यक्तींनीही लस घेऊ नये. वैद्यकीय सल्ल्यानंतरच लस घ्यावी.

या लशींचा प्रभाव किती दिवस राहील?

- त्याबद्दल ठोस सांगता येणार नाही. या सगळ्या लशी प्रचंड वेगाने तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांचा प्रभाव (Effectiveness) किती काळापर्यंत राहील, याबद्दलच्या चाचण्या झालेल्या नाहीत. त्यामुळे त्याबद्दल ठोस काही सांगता येणं शक्य नाही. तरीही काही शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे, की किमान 9 ते 12 महिन्यांपर्यंत या लशींचा प्रभाव टिकून राहू शकेल, यात काही शंका नाही. फायझर कंपनीकडून अलीकडेच एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार त्या कंपनीच्या लशीचा तिसरा डोस कदाचित वर्षभराने घ्यावा लागू शकतो. एकंदरीत विचार केला, तर लशींचा प्रभाव किती काळ टिकेल, याबद्दल आत्ताच काही ठोस सांगणं अवघड आहे. सध्याच्या परिस्थितीत मात्र त्या नक्की प्रभावी आहेत.

Corona Vaccination : कोरोना लस घेण्याआधी आणि घेतल्यानंतर काय करावं आणि काय नाही?

कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यास मृत्यू रोखण्यात यश मिळेल, याची खात्री यापैकी कोणतीही लस घेतल्यानंतर देता येते. दोन्ही डोस घेतल्यानंतर शरीरात अँटीबॉडीज विकसित होतात आणि तुमचं शरीर संसर्गाशी प्रभावीपणे लढा देतं. लस घेतल्यावरही संसर्ग झालाच तर सौम्य लक्षणंच दिसतात, आजार गंभीर स्वरूप धारण करत नाही, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

First published: May 4, 2021, 5:25 PM IST

ताज्या बातम्या