कोरोना वायरस

  • Associate Partner
  • diwali-2020
  • diwali-2020
  • diwali-2020

सण-उत्सवाच्या काळात भयंकर असू शकते कोरोनाची दुसरी लाट, AIIMS कडून अलर्ट

सण-उत्सवाच्या काळात भयंकर असू शकते कोरोनाची दुसरी लाट, AIIMS कडून अलर्ट

एम्सचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया म्हणतात की सणासुदीच्या काळात लोकांनी विशेष काळजी घ्यावी.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर : सणासुदीच्या काळात कोरोनाचा संसर्ग जास्त वेगानं पसरण्याची चिंता आहे. यंदाच्या सणावर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे हे सण सोशल डिस्टन्स आणि योग्य स्वच्छता राखून साजरे करण्याचं आवाहन प्रशासनाकडून देण्यात आलं आहे. या सणाचा काळात मात्र कोरोनाची दुसरी लाट भयंकर रुप घेऊ शकते अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याच संदर्भात एम्स रुग्णालयानं अलर्ट जारी केला आहे.

राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाची तिसरी लाट येणार का याबाबत चर्चा सुरू आहे. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी तिसर्‍या लाटेबद्दल चर्चा करणं टाळलं. तर कोरोनाची ही दुसरी लाट असून येत्या काळात आणखीन भयंकर रुप घेऊ शकते असंही ते म्हणाले. सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर न करणं आणि गाइडलाइन्स न पाळणं यामुळे ही भीषण स्थिती उद्भवत आहे. नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याची माहिती गुलेरिया यांनी दिली आहे.

हे वाचा-मानसिक आजार असलेल्यांना COVID-19 चा धोका; बळावतोय गंभीर कोरोना

प्रदूषणामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक वेगान वाढत आहे. प्रदूषणामुळे कोरोनाचे विषाणू बराच काळ हवेमध्ये टिकून राहात आहे. मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष केलं तर ते श्वसनावाटे थेट आपल्या शरीरात जातात. कोरोनाचा विषाणू आपल्या फुफ्फुसांवर थेट परिणाम करतात. कोरोना अद्यापही संपलेला नाही आणि नागरिकांनी ते विसरू नये. सोशल डिस्टन्सिंग पाळणं, मास्क लावणं याकडे लक्ष द्यायला हवं.

दुर्लक्ष केल्याने कोरोनाची आलेली ही दुसरी लाट आणखीन भयंकर रुप धारण करू शकते असंही गुलेरिया यांनी सांगितलं आहे. तर येत्या सणासुदीच्या काळात हा धोका वाढण्याबाबत चिंताही व्यक्त केला जात आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये फटाके फोडले जातात आणि त्यातून अधिक प्रदूषण वाढतं. त्यामुळे कोरोनाचे विषाणू जास्त काळ हवेत टिकून राहू शकतात. नागरिकांनी सावध राहाणं गरजेचं असल्यानं एम्स रुग्णालयाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.

एम्सचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया म्हणतात की सणासुदीच्या काळात लोकांनी विशेष काळजी घ्यावी. ते म्हणाले की ज्यांना सौम्य संसर्ग आहे त्यांना पुन्हा विषाणूची लागण होऊ शकते. या विषाणूमुळे रोग प्रतिकारशक्ती कमी होण्यास सुरवात होते. यामुळे, संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक असतो.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 31, 2020, 8:04 AM IST

ताज्या बातम्या