मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

108 वर्षांच्या आजोबांच्या तेराव्यानिमित्त गावात मोठा कार्यक्रम; पोलिसांनी धाड मारताच उडाला गोंधळ

108 वर्षांच्या आजोबांच्या तेराव्यानिमित्त गावात मोठा कार्यक्रम; पोलिसांनी धाड मारताच उडाला गोंधळ

कोरोनाची नियमावली असतानाही कार्यक्रमात 200 लोक जमा झाले होते. याशिवाय खाण्या-पिण्याचीही सोय करण्यात आली आहे.

कोरोनाची नियमावली असतानाही कार्यक्रमात 200 लोक जमा झाले होते. याशिवाय खाण्या-पिण्याचीही सोय करण्यात आली आहे.

कोरोनाची नियमावली असतानाही कार्यक्रमात 200 लोक जमा झाले होते. याशिवाय खाण्या-पिण्याचीही सोय करण्यात आली आहे.

  • Published by:  Meenal Gangurde
उज्जैन, 6 मे : कोरोना संक्रमण (Corona crisis) ची वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यूनंतरही काही लोक अद्याप नियमांचं पालन करीत नसल्याचं समोर आलं आहे. उज्जेन (Ujjain) मध्ये एका धर्मशाळेत तेरावं करण्यात आलं. त्यामध्ये 200 लोक उपस्थित होते. पोलिसांनी छापा मारला तर धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यानंतर धर्मशाळा सील करून जेवण गरीबांमध्ये वाटून देण्यात आलं. उज्जैनमधील जिल्हा प्रशासनाने 20 एप्रिल पासून सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आणली आहे. याशिवाय गोला मंडीस्थित माहेश्वरी धर्मशालामध्ये तेराव्याचा कार्यक्रम सुरू होता. 108 वर्षीय ज्येष्ठ व्यक्ती गोपी किशन यादव यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी तेराव्याचं आयोजन केलं होतं. 200 हून अधिक लोकांना यावेळी बोलावण्यात आलं. सर्वांसाठी खाण्यापिण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती. मात्र कोणीतरी कुवा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली. याबाबत माहिती मिळताच पोलीस आणि तहसीलदार तेथे पोहोचले. हे ही वाचा-मराठी मालिकांना कोरोनाचा फटका; महाराष्ट्रानंतर गोव्यातही शूटिंगला बंदी पोलीस पोहोचताच सर्वजणं पळाले माहेश्वरी धर्मशाळेत पोलीस पोहोचताच गोंधळ उडाला. येथे जमा झालेल्या 200 हून अधिक लोक इतके तिकडे पळू लागले. पाहता पाहता संपूर्ण धर्मशाळा रिकामी झाली. आचाऱ्यांपासून अगदी सफाई करणाऱ्यांनीदेखील पळ काढला. खाराकुवा पोलिसांना याबाबत सूचना मिळाली होती. माहेश्वीर धर्मशाळेत 108 वर्षीय गोपीकीशन यादव यांच्या मृत्यूनंतर तेराव्याचं आयोजन केलं होतं. त्यासाठी 200 हून अधिक लोकांना आमंत्रण देण्यात आलं आहे. पोलिसांनी अधिकारी सीएसपी पल्लवी शुक्ला व काही पोलिसांसह माहेश्वरी धर्मशाळेत पोहोचले तर कार्यक्रमात गोंधळ उडाला. जमा झालेले लोक कार्यक्रम सोडून पळ काढू लागले. सीएसपी पल्लवी शुक्ला यांनी सांगितलं की, कार्यक्रमाची माहिती मिळताच येथे आल्यानंतर मोठ्या संख्येने लोक जमा झालेले होते. काही वेळातच येथील लोकांनी पळ काढला. कार्यक्रमांना बंदी असतानाही येथे तेराव्याचं आयोजन केलं होतं. आयोजन महेश यादव याच्या विरोधात 188 ,269 , 270 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसीलदार श्रीकांत शर्मा यांनी सांगितलं की, माहेश्वरी धर्मशाळेला सील करण्यात आलं आहे. कार्यक्रमात जे अन्न शिल्लक होतं, ते गरीबांमध्ये वाटण्यात आलं. कार्यक्रमात काँग्रेस नेता आणि नगर निगमचे माजी सभापती आजाद यादवदेखील उपस्थित होते.
First published:

Tags: Corona spread

पुढील बातम्या