आधी डेंग्यू झाला, मग कोरोना आणि आता साप चावला; भारतात अडकलेल्या विदेशी पर्यटकाची अशी झाली अवस्था

एकदा नाही तीन वेळा केला मृत्यूशी सामना! 8 महिन्यांपासून भारतात असलेल्या या विदेशी पर्यटकाची मन हेलावून टाकणारी कहाणी एकदा वाचाच.

एकदा नाही तीन वेळा केला मृत्यूशी सामना! 8 महिन्यांपासून भारतात असलेल्या या विदेशी पर्यटकाची मन हेलावून टाकणारी कहाणी एकदा वाचाच.

  • Share this:
    जयपूर, 22 नोव्हेंबर : लॉकडाऊनमध्ये भारतात अकडलेल्या एक विदेशी व्यक्तीची व्यथा ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. राजस्थानमध्ये अडकलेल्या या विदेशी व्यक्तीला एकदा किंवा दोनदा नाही तर तीनवेळा मृत्यूचा सामना करावा लागला. या व्यक्तीला सर्वप्रथम भारतात असताना डेंग्यूचे निदान झाले, त्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाली. यातून बरा होत असतानाच सर्पदंश झाल्यानं पुन्हा या व्यक्तीवर आता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इयॉन जॉन्सन असे या विदेशी व्यक्तीचे नाव असून जयपूरपासून 350 किलोमीटर अंतरावर एका विषारी कोब्रा इयॉनला चावला. आता त्याच्यावर जोधपूरमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर उपचार करत असलेले डॉक्टर अभिषेक टेटर यांनी सांगितले की, 'ते गेल्या आठवड्यात येथे आले होते. त्यांना गावात साप चावला. सुरुवातीला आम्हाला असे वाटले की त्यांना पुन्हा कोरोनाची लागण तर झाली नाही ना, मात्र त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. जॉन्स यांना डोळ्यांनी नीट दिसत नाही, त्यामुळे त्यांना चालताना त्रास होतो. वाचा-कोरोनामुळे 10 वर्षांच्या मुलाचे आतडे सडले, 3 महिन्यात केल्या 4 शस्त्रक्रिया डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, इयॉनला गेल्या आठवड्यातच डिस्चार्ज देण्यात आला होता. GoFundMe च्या वेबसाइटवर निवेदन प्रसिद्ध करतांना इयॉन यांच्या मुलानं आपले वडिला फायटर असल्याचे सांगितले. वाचा-कोरोनावर 94.5 % प्रभावी Vaccine ची किंमत तापाच्या औषधापेक्षाही कमी ते म्हणाले की, 'भारतात राहत असताना इयॉन यांनी आधी मलेरियाचा ताप आला होता. यानंतर त्याला डेंग्यू झाला. डेंग्यूपासून बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा मलेरियाचा झाला. यानंतर, ते कोरोना पॉझिटिव्ह निघाले, आणि आता त्यांना विषारी कोब्रा चावला. इयॉनच्या मुलाने सांगितले की, त्यांचे वडील कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे भारतात अडकले. त्यामुळे ते ब्रिटनमध्ये परत येऊ शकत नाहीत.
    Published by:Priyanka Gawde
    First published: