मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /आईनंतर मुलाचाही कोरोनामुळे मृत्यू; दोघांवर अंत्यसंस्कारही झाले, 15 दिवसांनी साक्षात दारात उभी राहिली महिला

आईनंतर मुलाचाही कोरोनामुळे मृत्यू; दोघांवर अंत्यसंस्कारही झाले, 15 दिवसांनी साक्षात दारात उभी राहिली महिला

15 दिवसांनी महिलेला दारात उभं असलेलं पाहून कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्काच बसला.

15 दिवसांनी महिलेला दारात उभं असलेलं पाहून कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्काच बसला.

15 दिवसांनी महिलेला दारात उभं असलेलं पाहून कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्काच बसला.

हैदराबाद, 3 जून : आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) एका 75 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आल्यानंतर कुटुंबावर मोठा आघात झाला होता. आंध्रप्रदेशातील कृष्णा जिल्ह्यात राहणाऱ्या आणि कोरोनाची लागण झालेल्या (Coronavirus) गिरिजम्मा यांना रुग्णालयात मृत घोषित करण्यात आलं होतं. मात्र 15 दिवसांनी आजीला दारात उभं असलेलं पाहून कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्काच बसला.

नेमका काय आहे हा प्रकार?

India.com ने दिलेल्या बातमीनुसार, कृष्णा जिल्ह्यातील क्रिश्चियनपेट भागातील गिरिजम्मा नावाच्या महिलेला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर 12 मे रोजी त्यांना विजयवाडा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. महिलेला दाखल केल्यानंतर त्यांचे पती घरी परतले. 15 मे रोजी पत्नीची प्रकृती विचारण्यासाठी ते रुग्णालयात पोहोचले तेव्हा गिरिजाम्मा बेडवर नव्हती आणि रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, त्यांना दुसऱ्या वॉर्डात हलविण्यात आलं असावं. रुग्णालयातील सर्व वॉर्ड तपासल्यानंतर गिरिजम्मा सापडल्या नाहीत. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी शवगृहात पाहिलं. यावेळी शवगृहात त्यांच्या पत्नीसारख्या एका महिलेचा मृतदेह दिसला. त्यानंतर रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी डेथ सर्टिफिकेट जारी केलं. इतकच नाही तर कुटुंबीय मृतदेह घरी घेऊन गेले व त्यांच्यावर अंत्यसंस्कारही केले.

हे ही वाचा-Maharashtra Unlock : नाशिककरांना सुखद धक्का; जाणून घ्या काय होणार सुरू

मुलाचा कोरोनामुळे मृत्यू

गिरिजम्मा यांचा मुलगा रमेश याचा 23 मे रोजी कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला आणि कुटुंबाने त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. कुटुंबीयांनी गिरिजम्मा आणि रमेश दोघांसाठी प्रार्थनासभेचं आयोजनही केलं. घरातील सदस्यांना वाटले की आजीचाही मृत्यू झाला. म्हणून कोणी रुग्णालयातही गेलं नाही. दुसरीकडे गिरिजम्मा रुग्णालयात विचार करीत होती की तिला नेण्यासाठी कोणीच का आलं नाही. यानंतर बुधवारी 1 जून रोजी त्या स्वत:च घरी परतल्या. गिरिजम्मा यांना पाहून कुटुंबाबरोबरच सर्वांनाच धक्का बसला. अर्थात हा सर्वांसाठी सुखद धक्का होता.

First published:

Tags: Corona patient, Corona virus in india, Death