महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात कोरोनाचा उद्रेक; गेल्या 24 तासांत 'इतक्या' रुग्णांची नोंद

महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात कोरोनाचा उद्रेक; गेल्या 24 तासांत 'इतक्या' रुग्णांची नोंद

Coronavirus in Uttar Pradesh: उत्तरप्रदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचं पहायला मिळत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येऊ लागला आहे.

  • Share this:

लखनऊ, 21 एप्रिल: उत्तरप्रदेशात (Uttar Pradesh) आता कोरोनाचं (Corona) संक्रमण अधिक वेगाने पसरत असल्याचं आकडेवारीवरुन दिसत आहे. यामुळे उत्तरप्रदेश सरकारची सुद्धा चिंता वाढली आहे. कोरोनाने संपूर्ण उत्तरप्रदेशात संसर्ग पसरवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या 24 तासांतील आकडेवारीनुसार, 33214 नवीन कोरोना बाधितांची नोंद (33214 new cases reported) झाली आहे. तर लखनऊमध्ये 5902 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर संपूर्ण राज्यात 14198 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

एक दिवस आधी उत्तरप्रदेशात 29,754 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली होती. ज्यामध्ये आज वाढ झाली आहे. यामुळे उत्तरप्रदेशातील सक्रिय रुग्णांची संख्या 2 लाख 23 हजार 544 इतकी झाली आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे मात्र, संसर्ग अद्यापही वाढतच आहे.

कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने कठोर निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. विना मास्क किंवा गमछा घातल्याशिवाय घरातून नागरिकांना बाहेर पडता येणार नाही. विना मास्क आढळल्यास 1000 रुपये दंड ठोठवण्यात येत आहे. तर दुसऱ्यांदा विना मास्क आढळून आल्यास 10,000 रुपये दंड ठोठावला जात आहे. उत्तरप्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य आणि वैद्यकीय अमित मोहन प्रसाद यांनी मंगळवारी ही माहिती दिली.

वाचा: Corona काळात नेतागिरी सोडून लोकांच्या मदतीला धावले 'हे' कोरोना योद्धे

आदेशानुसार, एखादा व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा घराबाहेर मास्क, रुमाल, गमछा, दुपट्टा शिवाय आढळून आल्यास त्याला 1000 रुपये दंड ठोठावण्यात येत आहे. तर सार्वजनिक ठिकाणी कुणी थुंकल्यास त्या व्यक्तीला 500 रुपये दंड ठोठावला जात आहे.

महाराष्ट्रातही कोरोनाचा उद्रेक

महाराष्ट्रात आज 67,468 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 568 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. आज राज्यातील 54,985 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 24614480 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 4027827 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

Published by: Sunil Desale
First published: April 21, 2021, 10:04 PM IST

ताज्या बातम्या