Home /News /coronavirus-latest-news /

तो व्हिडीओ कॉल शेवटचा ठरला! मुलीला जन्म दिल्यानंतर आईचा कोरोनाने मृत्यू

तो व्हिडीओ कॉल शेवटचा ठरला! मुलीला जन्म दिल्यानंतर आईचा कोरोनाने मृत्यू

सुरतच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या कोविड वॉर्डमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तहाननेने व्याकुळ झालेल्या एका महिलेचा श्वास कोंडत होता परंतु तिला पाहण्यासाठी रुग्णालयात कोणीही हजर नव्हतं.

  सुरत, 23 मार्च : सुरतच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या कोविड वॉर्डमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तहाननेने व्याकुळ झालेल्या एका महिलेचा श्वास कोंडत होता परंतु तिला पाहण्यासाठी रुग्णालयात कोणीही हजर नव्हतं. महिलेने आपल्या दीराला व्हिडीओ कॉलवर परिस्थिती सांगत मदत मागितली. त्यानंतर त्या महिलेच्या कुटुंबियांनी रुग्णालयात डॉक्टरांपासून वॉर्ड कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना फोन केले. परंतु कोणीही फोनला उत्तर दिलं नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 20 मार्च रोजी सकाळी महिलेला मृत घोषित करण्यात आलं. या महिलेचं नाव पूमन असं आहे. 19 मार्च रोजी रात्री ज्यावेळी वहिनीला व्हिडीओ कॉल केला, त्यावेळी ती जागेवरुन उठूही शकत नसल्याची माहिती पूनमबेनचा दीर दीपकने दिली. पूमनबेनने 18 मार्च रोजी हॉस्पिटलमध्ये एक मुलीला जन्म दिला. याआधी महिलेची कोविड चाचणी करण्यात आली होती. पहिल्या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. परंतु डिलिव्हरीनंतर पुन्हा कोरोना टेस्ट करण्यात आली, त्या चाचणीचा रिपोर्ट मात्र पॉझिटिव्ह आला. त्यानंतर पूमनबेनला कोविड वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं.

  (वाचा - 10 लाख दे किंवा घटस्फोट घे!कोरोना झाल्याने नर्सला काढलं घराबाहेर, आता असा पर्याय)

  डिलिव्हरीनंतर एक किडनी लगेच कशी फेल झाली? विजयनगर सोसायटीमध्ये राहणाऱ्या पूनमबेनचा विवाह 9 वर्षांपूर्वी तुषार जेठेशी झाला होता. त्यांना याआधी एक मुलगीही आहे. दुसऱ्या मुलीला जन्म दिल्यानंतर लगेचच डॉक्टरांनी पूनमची एक किडनी फेल झाल्याचं सांगितलं, अशी माहिती तिच्या दीराने दिली.

  (वाचा - महिना 7 लाख रुपये पगार, आवडीचं काम, राहणं-खाणंही फ्री; या कंपनीची जबरदस्त नोकरी)

  यापूर्वी कधीही किडनीची समस्या नसताना आता, मुलीच्या जन्मानंतर लगेचच किडनी कशी फेल झाली असा सवाल तिच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणात डॉक्टरांकडूनच बेजबाबदारपणा झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.
  Published by:Karishma
  First published:

  पुढील बातम्या