मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Alert! Covishield कोरोना लस घेतल्यानंतर अशी लक्षणं दिसल्यास दुर्लक्ष करू नका

Alert! Covishield कोरोना लस घेतल्यानंतर अशी लक्षणं दिसल्यास दुर्लक्ष करू नका

कोविशिल्ड कोरोना लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर 10 ते 22 दिवसांतच ही लक्षणं दिसू लागली.

कोविशिल्ड कोरोना लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर 10 ते 22 दिवसांतच ही लक्षणं दिसू लागली.

कोविशिल्ड कोरोना लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर 10 ते 22 दिवसांतच ही लक्षणं दिसू लागली.

नवी दिल्ली, 24 जून : कोरोनापासून संरक्षण मिळावं यासाठी कोरोना लस (Corona vaccine) दिली जाते आहे. पण त्याचे काही सौम्य दुष्परिणामही दिसून (Corona vaccine side effect) येत आहेत. कोरोना लस घेतल्यानंतर ताप, अशक्तपणा अशी समस्या बहुतेकांना उद्भवते आहे. पण काही जणांच्या चेहऱ्यावर याचा गंभीर परिणाम दिसून आला आहे. कोविशिल्ड (Covishield Vaccine) लस घेतल्यानंतर गंभीर असा सिंड्रोम झाल्याचं दिसून आलं आहे.

कोरोना लशीबाबत भारत एक संशोधन झालं. त्यामध्ये कोविशिल्डची लस घेतल्यानंतर भारतात काही जणांमध्ये न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर दिसून आला आहे. या  गुलियन बेरी सिंड्रोम (Guillain-Barre Syndrome) असं म्हटलं जातं.

भारतात अशी सात प्रकरणं आढळून आल्याचा दावा एका मीडिया रिपोर्टमध्ये कऱण्यात आला आहे. पहिला डोस घेतल्यानंतर 10 ते 22 दिवसांतच या सिंड्रोमची लक्षणं दिसू लागली.

हे वाचा - देशात डेल्टा+ व्हेरिएंटमुळे कोरोनाची तिसरी लाट येणार?, तज्ज्ञांची मोठी माहिती

गुलियन बेरी सिंड्रोम हा दुर्मिळ आजार आहे. हा नर्व्हस सिस्टमशी संबंधित एक आजार आहे. यामध्ये इम्युनिटी आणि नर्व्हस सिस्टममधील निरोगी टिश्य़ूजवर हल्ला करतात. यात प्रामुख्याने चेहऱ्यावरील नसा कमजोर होतात.  जर हा आजार संपूर्ण शरीरभर पसरला तर त्या व्यक्तीला लकवा मारू शकतो.

एनाल्स ऑफ न्यूरोलॉजीमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार ज्या लोकांमध्ये हा सिंड्रोम दिसून आला आहे. त्यांचा चेहरा कमजोर झाला होता. 20 टक्क्यांपेक्षा कमी प्रकरणात असं दिसून येतो. हा आजार इतक्या वेगाने पसरला तरी कसा, याबाबत अभ्यास करणारे शास्त्रज्ञही आश्चर्यचकित झाले आहेत. अशक्तपणा, चेहऱ्यावरील मांसपेशी कमजोर होणं, हातापायात मुंग्या येणं, हृदयाचे अनियमित ठोके ही याची लक्षणं आहेत.

हे वाचा - Explainer: कोरोनाविरुद्धची प्रतिकारशक्ती आपल्यात आहे का हे कसं समजतं?

कोरोना लस सुरक्षित आहे, पण तरी काळजी घेण्याची गरज आहे, असं संशोधकांनी सांगितलं. त्यामुळे सिंड़्रोमची कोणतीही लक्षणं दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus