मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Twindemic: सावधान! हिवाळ्यात कोरोनासोबत 'या' रोगाचाही होणार अटॅक, शास्त्रज्ञांचा इशारा

Twindemic: सावधान! हिवाळ्यात कोरोनासोबत 'या' रोगाचाही होणार अटॅक, शास्त्रज्ञांचा इशारा

हिवाळ्यात 'ट्विंडिमिक' (Twindemic) किंवा डबल अटॅक सारखी परिस्थिती उद्दभवण्याचा इशारा दिला आहे.

हिवाळ्यात 'ट्विंडिमिक' (Twindemic) किंवा डबल अटॅक सारखी परिस्थिती उद्दभवण्याचा इशारा दिला आहे.

हिवाळ्यात 'ट्विंडिमिक' (Twindemic) किंवा डबल अटॅक सारखी परिस्थिती उद्दभवण्याचा इशारा दिला आहे.

  • Published by:  Priyanka Gawde

न्यूयॉर्क, 16 ऑगस्ट : कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अगदी कोरोनामुक्त झालेल्या न्यूझीलंडसारख्या देशांतही कोरोनानं पुन्हा शिरकाव केला आहे. अशा परिस्थितीत वैज्ञानिकांनी हिवाळ्यात 'ट्विंडिमिक' (Twindemic) किंवा डबल अटॅक सारखी परिस्थिती उद्दभवण्याचा इशारा दिला आहे. सार्वजनिक आरोग्य तज्ञांच्या म्हणण्यानुसार येत्या काळात कोव्हिड -19 बरोबरच सिझनल फ्लूचाही अटॅक होऊ शकतो. शास्त्रज्ञ या परिस्थितीला Twindemic म्हणतात.

न्यूयॉर्क टाइम्समधील एका वृत्तानुसार, हिवाळ्यात सिझनल फ्लू हा सामान्य आजार आहे, मात्र कोरोनामुळे रुग्णालयात इतर रुग्णांसाठी जागा शिल्लक नाही आहे. अशा परिस्थितीत हंगामी फ्लूच्या रूग्णांवर उपचार कोठे होतील? दुसरा प्रश्न असा आहे की कोव्हिड -19 आणि सिझनल फ्लूची सुरुवातीची लक्षणे देखील एकसारखी असतात, अशा परिस्थितीत रुग्णालयांमध्ये गर्दी वाढेल आणि रुग्णांमध्ये संभ्रमही निर्माण होईल.

वाचा-रशियाच्या Sputnik-V लशीपासून काय आहे धोका? डॉक्टरांनी व्यक्त केली चिंता

तज्ञांच्या मते फ्लूची लक्षणे देखील- ताप, डोकेदुखी, कफ, घशात दुखणे, शरीरावर वेदना आहेत. एकीकडे, ही लक्षणं कोव्हिड-19 सारखी दिसतात, आणि दुसरीकडे कोरोना संसर्गाचा धोकाही वाढवतात. फ्लू होण्याची शक्यता असलेल्या व्यक्तीलाही कोरोनाची लागण होऊ शकते.

वाचा-‘लशी’साठी जीव धोक्यात घालण्यास तयार, 22 वर्षांच्या तरुण शास्रज्ञाने दाखवली तयारी

शास्त्रज्ञांची चिंता वाढली

जगभरातील शास्त्रज्ञ Twindemic विषयी चिंतेत आहेत आणि 'फ्लू शॉट' वर खूप जोर देत आहेत. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशनचे (CDC) संचालक रॉबर्ट रेडफिल्ड म्हणाले की आम्ही मोठ्या कंपन्यांना 'फ्लू शॉट्स' देण्यासाठी मोहीम सुरू करण्यास सांगितले आहे. CDCदरवर्षी रूग्णालयात 5 लाख डोस देतात, मात्र यावेळी 9.3 फ्लू शॉट्स आधीच मागवले आहेत. अमेरिकन कोरोना तज्ज्ञ डॉक्टर अॅथोनी फोसे यांनीही लोकांना फ्लूचे शॉट घेण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की याद्वारे आपण एकाच वेळी दोन श्वसन रोगांपैकी एकापासून वाचू शकतो.

First published:

Tags: Corona, Corona virus in india