Home /News /coronavirus-latest-news /

कोरोनानंतर आता भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन

कोरोनानंतर आता भयंकर Bubonic plague चा उद्रेक, 'या 'शहरांमध्ये लागू होणार लॉकडाऊन

हा रोग मुख्यत: जंगली उंदरांमध्ये आढळणार्‍या बॅक्टेरियांमुळे होतो. या बॅक्टेरियाचे नाव येरसिनिया पेस्टिस बॅक्टेरियम (Yersinia Pestis Bacterium) आहे.

    बीजिंग, 30 सप्टेंबर : कोरोनाव्हायरसने (Coronavirus) साऱ्या जगाला हादरवलं असताना आता आणखी एका रोगाचा उद्रेक झाला आहे. उत्तर चीनमधील मंगोलियामध्ये कोरोनापेक्षाही खतरनाक मानल्या जाणाऱ्या Bubonic plague चा उद्रेक झाला आहे. मंगोलियामध्ये आतापर्यंत 22 लोकांना या रोगाची लागण झाली आहे. तर, तीन जणांचा या रोगामुळे मृत्यू झाला आहे. यात तीन वर्षांच्या बाळाचाही यात समावेश आहे. असे सांगितले जात आहे की ब्यूबोनिक प्लेगची लक्षण न्युमोनियासारखीच असतात., हा रोग मुख्यत: जंगली उंदरांमध्ये आढळणार्‍या बॅक्टेरियांमुळे होतो. या बॅक्टेरियाचे नाव येरसिनिया पेस्टिस बॅक्टेरियम (Yersinia Pestis Bacterium) आहे. हा जीवाणू शरीरातील लिम्फ नोड्स, रक्त आणि फुफ्फुसांवर हल्ला करतो. वाचा-अरे देवा! कोरोनानंतर आता भारतावर आणखी एका चीनी व्हायरसचं संकट; ICMR ने केलं सावध यामुळे बोटं काळी पडतात व सडतात. याआधी WHOनं सुरुवातीच्या काळात ब्यूबॉनिक प्लेग हा जास्त खतरनाक नाही आहे आणि चीन योग्य प्रकारे या परिस्थितीशी सामना करत आहे, असे सांगितले होते. मात्र आता मंगोलिया आणि आजू बाजूच्या परिसरातील लोकांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर, लॉकडाऊन लागू करण्याबाबतही विचार केला जात आहे. वाचा-प्रत्येकी पंधरावा मुंबईकर कोरोनाला गेला सामोरा; Sero Surveyची धक्कादायक आकडेवारी कोरोनापेक्षा भयंकर आहे ब्यूबोनिक प्लेग याआधी नोव्हेंबर 2019 मध्ये अशी 4 प्रकरणे आली ज्यामध्ये प्लेगचे 2 धोकादायक प्रकार आढळले. त्याला न्यूमोनिक प्लेग असे म्हणतात. चीनच्या इनर मंगोलिया स्वायत्त प्रदेशातील एका शहरात ब्यूबोनिक प्लेगचा प्रकार उघडकीस आल्यानंतर चिंता व्यक्त केली जात आहे. ब्यूबॉनिक प्लेग प्रथम जंगली उंदरांना होतो. उंदरांच्या मृत्यूनंतर या प्लेगचे जीवाणू मानवी शरीरात प्रवेश करतात. उंदरांच्या मृत्यूनंतर दोन ते तीन आठवड्यांनंतर मानवामध्ये प्लेग पसरतो. ब्यूबॉनिक प्लेग प्रथम जंगली उंदरांना होतो. उंदरांच्या मृत्यूनंतर या प्लेगचे जीवाणू मानवी शरीरात प्रवेश करतात. उंदरांच्या मृत्यूनंतर दोन ते तीन आठवड्यांनंतर मानवामध्ये प्लेग पसरतो.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या