Home /News /coronavirus-latest-news /

COVID-19 नंतर आणखी एका आजाराचं थैमान! अहमदाबादमध्ये 9 जणांचा मृत्यू

COVID-19 नंतर आणखी एका आजाराचं थैमान! अहमदाबादमध्ये 9 जणांचा मृत्यू

पूर्ण जग सध्या कोरोना महामारीचा (Coronavirus Pandemic) सामना करत आहे. त्यापाठोपाठ देशात आणखी एका आजारानं हातपाय पसरवण्यास सुरुवात केलीय. म्यूकोरमाइकोसिस (Mucormycosis) असं या आजाराचं नाव आहे.

    अहमदाबाद, 18 डिसेंबर : संपूर्ण जग सध्या कोरोना महामारीचा (Coronavirus Pandemic)  सामना करत आहे. या आजारावर प्रभावी लस सापडलेली नसतानाच देशात आणखी एका आजारानं हातपाय पसरवण्यास सुरुवात केलीय. म्यूकोरमाइकोसिस (Mucormycosis) असं या आजाराचं नाव असून दिल्ली, मुंबई आणि अहमदाबादमध्ये या आजाराचे रुग्ण आढळले आहेत. गुजरात (Gujrat) अहमदाबादमध्ये (Ahmedabad) या आजारनं थैमान घालण्यास सुरुवात केले आहे. अहमदाबादमध्ये एकूण 44 जणांना या आजाराची लागण झाली असून त्यामधील 9 जणांचा मृत्यू झाला आहे. काय आहे म्यूकोरमाइकोसिस? म्यूकोरमाइकोसिस हे एक दुर्मिळ फंगल इंन्फेक्शन आहे. या आजारातील रुग्णांची किटाणूंशी लढण्याची क्षमता कमी होते. चेहरा सुजणे, डोकेदुखी, तोंडाच्या वरचा भाग दुखणे आणि डोकेदुखी अशी या आजाराची लक्षणं आहेत. या आजाराचा डोळ्यांवर सर्वात जास्त परिणाम होता. योग्य उपचार न झाल्यास डोळे कायमचे निकामी होऊ शकतात. (हे वाचा-नव्या वर्षात फेब्रुवारीपर्यंत भारतातला कोरोनाचा जोर खरंच ओसरणार?) दिल्लीतल्या सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये या आजाराची लागण झालेली  13 रुग्ण दाखल झालेली आहेत. यापैकी 50 टक्के रुग्णांचे डोळे निकामी झाले आहेत. तसंच काही रुग्णांच्या मेंदूलाही  धोका निर्माण झाला असल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. कुणाला अधिक धोका? मधुमेहाचे रुग्ण (Diabetes patient) किंवा ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे, अशा रुग्णांना याचा धोका आहे. कोरोनामधून बरं झालेल्या रुग्णांमध्येही या आजाराची लक्षणं आढळून आलेली आहेत. काय काळजी घ्यावी? कोरोनाची लागण झाल्यास मधुमेह पूर्णपणे नियंत्रणात ठेवणे आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे हा या आजारावरील उपाय आहे. स्वच्छतेची सवयी, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर, तसेच डोळे आणि नाकाला वारंवार हात न लावणे या प्राथमिक सवयी या आजरापासून तुमचे संरक्षण करु शकतात. या आजारावर प्राथमिक अवस्थेमध्येच डॉक्टरांनी उपचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ahmedabad, Covid19, Gujrat

    पुढील बातम्या