कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी तयार केला अॅडवान्स फेस मास्क; वाचा काय आहे खासियत?

कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी तयार केला अॅडवान्स फेस मास्क; वाचा काय आहे खासियत?

हा मास्क अत्यंत उपयुक्त असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर : लोक स्वतःचे रक्षण करण्यासाठीच नव्हे तर इतरांचे संरक्षण करण्यासाठी मास्क घालतात. हे लक्षात घेऊन, संशोधकांनी एक नवीन मास्क तयार केला आहे. मास्क वापरणाऱ्याला कमी प्रमाणात संसर्ग असावा हा त्यांचा उद्देश आहे. मुख्य कल्पना अशी आहे की अँटिव्हायरस रसायनांचा वापर करून मास्कचं कापड असं बनवायचं की जे श्वासावाटे बाहेर निघणाऱ्या जंतूना सॅनिटाईझ करेल.

मॅटर या जर्नलमध्य प्रकाशित या अभ्यासासाठी प्रयोगशाळेत एक्झेलेशन, इन्हलेशन, खोकला आणि शिंकणं या गोष्टींवर करून मास्कची तपासणी करण्यात आली त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की न विणलेल्या कापडापासून मास्क तयार केला तर त्यांनी मांडलेली संकल्पना व्यवस्थित स्पष्ट करता येऊ शकते. आम्हाला लगेच समजले की मास्क केवळ तो घालणाऱ्या व्यक्तीचं संरक्षण करत नाही तर त्याहून महत्त्वाचं म्हणजे मास्क घालणाऱ्या व्यक्तीच्या तोंडातून निघणार्‍या जंतूंनी संसर्ग होण्यापासून इतरांचं संरक्षण करतो, असं अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातील अभ्यासक जिझियांग ह्युआंग यांनी सांगितलं.

जरी मास्क श्वासावाटे बाहेर निघणाऱ्या शिंतोडे रोखले जात असले तरीही काही प्रमाणात शिंतोडे त्यातून निसटतातच. एकतर ते दुसऱ्या माणसाला थेट संसर्गित करतात किंवा पृष्ठभागांवर राहतात. यामुळेच इतरांना संसर्ग होतो. या गोष्टी लक्षात घेऊन हे निसटणारे शिंतोडे निष्क्रिय करण्यासाठी ह्युआंग यांच्या टिमने एक वेगळ्या प्रकारचा फॅब्रिक मास्क तयार करण्याचा प्रयत्न केला.

(1) ज्याने श्वास घेणं कठीण होणार नाही

(2) ज्यात असिड किंवा मेटल आयनसारख्या मॉलिक्युलर अँटिव्हायरल एजंटचा वापर करता येईळ जेणेकरून निसटलेले शिंतोडे त्यात विरघळतील.

(3) व्होलेटाइल केमिकल किंवा डिटॅच होणारं मटेरियल यात वापरायचं नाही जेणेकरून वापरणाऱ्याकडून ते श्वासोच्छवासावाटे शरीरात जाऊ नयेत.

हे ही वाचा-हर्ड इम्युनिटी कुचकामी; दुसऱ्यांदा Covid झालेल्या शास्त्रज्ञाचा दावा

अनेक प्रयोगानंतर संशोधन पथकाने फॉस्फरस ॲसिड आणि कॉपर सॉल्ट या दोन प्रसिद्ध अँटीव्हायरल रसायनांची निवड केली. ही रसायनं त्यांनी ठरवलेल्या कसोट्या पूर्ण करत होती. तसंच मास्कच्या फॅब्रिकवर पॉलिअनिलाइनचा थर दिला. हा थर कापडाला चिकटून राहतो आणि असिड व कॉपर सॉल्टलाही धरून ठेवतो. संशोधकांना असे आढळले आहे की मऊ कापड ज्याची पॅकिंग डेन्सिटी 11 आहे ते पण उच्छवासातून बाहेर पडलेले 28 टक्के शिंतोडे बाहेर पडण्यापासून थांबवू शकतं. तर टाईट फायबर उदाहरणार्थ प्रयोगशाळेत सफाईसाठी वापरला जाणारं लिंट फ्री  कापड 82 टक्क्यांपर्यंत शिंतोडे रोखतं. संशोधकांना आशा आहे की हे कार्य लवकरात लवकर पुढे जाईल व लोकांना असा मास्क वापरायला मिळेल ज्याने कमी प्रमाणात संसर्ग होईल.

Published by: Meenal Gangurde
First published: October 30, 2020, 9:36 PM IST

ताज्या बातम्या