Home /News /coronavirus-latest-news /

कोरोनाविरोधातील लढ्यात चष्माही ठरतोय मोठं शस्त्र; नेमकं कसं ते वाचा

कोरोनाविरोधातील लढ्यात चष्माही ठरतोय मोठं शस्त्र; नेमकं कसं ते वाचा

Corona research

Corona research

ज्याप्रमाणे तोंडावर मास्क त्याप्रमाणे डोळ्यांवर चष्मा असेल तर कोरोनापासून तुम्ही सुरक्षित राहू शकता.

नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी :  कोरोनापासून (coronavirus) बचाव करण्यासाठी सर्वसामान्यांच्या हातातील मोठं शस्त्र म्हणजे मास्क आणि सॅनिटायझर. पण आता या यादीत चष्म्याचा समावेश करण्यास हरकत नाही. कारण चष्मादेखील कोरोनाविरोधातील लढ्यात मोठी भूमिका बजावत असल्याचं दिसून आलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल हे नेमकं कसं? चष्मा आणि कोरोना याबाबत भारतातील संशोधकांनी अभ्यास केला. भारतीय संशोधकांनी (Indian researchers) केलेलं संशोधन medRxiv या वेबसाइटवर  प्रकाशित करण्यात आलं आहे. या संशोधनामध्ये कोरोनाची लक्षणं आढळलेल्या 10 ते 80 वयोगटातील रुग्णांचा समावेश आहे. या संशोधनात 304 रुग्णांवर अभ्यास करण्यात आला असून यामध्ये 223 पुरुष आणि 81 महिलांचा समावेश होता. यामधील फक्त 19 टक्के व्यक्ती सतत चष्मा वापरत होते. या व्यक्तींनी एका तासामध्ये सरासरी 23 वेळा तोंडाला हात लावला. त्यापैकी तीन वेळा डोळ्यांना हात लावला. इंडिपेंडन्टच्या रिपोर्टनुसार, चष्मा न घालणाऱ्यांपेक्षा चष्मा घालणाऱ्या लोकांमध्ये कोविड-19 चा धोका दोन ते तीन पटीने कमी होता, असं या संशोधनातून स्पष्ट करण्यात आलं. हे वाचा - आता तरी लसीकरणाचा वेग वाढवा; मोदी सरकारने ठाकरे सरकारला लिहिलं पत्र कोरोनाची लागण होण्याचा सर्वात महत्वाचा मार्ग म्हणजे आपला अस्वच्छ हात डोळे, नाक आणि तोंडाला लावणं आणि चोळणं. अशामध्ये चष्म्याचा सतत वापर केल्यामुळे आपण डोळ्याना स्पर्श कमी वेळा करतो. त्यामुळे चष्मा लावणाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याचा धोका कमी असतो. ज्या व्यक्ती 8 तास चष्मा लावतात त्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी असते, असं निष्कर्ष या संशोधनातून निघाला. यापूर्वी डॉक्टरांनी ज्या व्यक्ती कॉन्टॅक्ट लेन्स (contact lenses) वापरतात त्यांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी चष्मा वापरण्याचा सल्ला दिला होता. हे वाचा -  ठाकरे सरकारचा मोदी सरकारला जोरदार झटका; Coronil बाबत घेतला मोठा निर्णय डेली मेलच्या वृत्तानुसार गेल्या वर्षी चीनमधील संशोधकांच्या असं लक्षात आलं होतं की, सामान्यांपेक्षा चष्मा असलेल्या व्यक्तींना कोविड होण्याचा धोका पाच पटींनी कमी होतो. द सेकंड अफिलिएटेड हॉस्पिटल ऑफ नानचंग युनिव्हर्सिटीतील संशोधकांच्या टीमनं तर सांगितलं होतं की, कोविड विषाणू ज्या रिसेप्टरच्या माध्यमातून माणसाच्या शरीरात प्रवेश करतात तो रिसेप्टर ACE-2 हा डोळ्यांत असतो. SARS-CoV-2 हा कोरोनाचा विषाणू मानवी शरीरात डोळ्यांतून प्रवेश करू शकतो आणि चष्मा वापरणाऱ्यांचे डोळे चष्म्यामुळे या विषाणूपासून सुरक्षित राहतात त्यामुळे त्यांना धोका कमी असतो, असं या अभ्यासात म्हटलं आहे.
Published by:news18 desk
First published:

Tags: Coronavirus, Covid19, India, Research

पुढील बातम्या