मुंबई, 24 मार्च: अभिनेता आमिर खान (Aamir Khan) देखील कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. आमिर खान सध्या होम क्वारंटाइन असून कोव्हिड-19 संदर्भातील सर्व गाइडलाइन्सचं पालन करत तो विशेष खबरदारी घेत आहे. आमिर खानच्या प्रवक्त्याने याबाबत माहिती दिली आहे. शिवाय त्यांनी अशी देखील माहिती दिली आहे की आमिरच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी खबरदारी म्हणून कोरोनाची चाचणी करून घ्यावी.
Aamir Khan has tested positive for COVID-19. He is at home in self-quarantine, following all the protocols and he’s doing fine. All those who came in contact with him in the recent past should get themselves tested as a precautionary measure: Spokesperson of Aamir Khan. pic.twitter.com/85j4MDmadr
— ANI (@ANI) March 24, 2021
दरम्यान बॉलिवूडकरांवर कोरोनाचं संकट वाढू लागल्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे. पुन्हा एकदा चित्रपटांच्या शूटिंगवर निर्बंध येण्याची भीती सध्या व्यक्त केली जाते आहे.
(हे वाचा-CCTV VIDEO: बॅडमिंटन खेळताना आला हृदयविकाराचा झटका, पोलिसाचा जागीच मृत्यू)
जागतिक जल दिनी सोमवारी पाणी फाउंडेशनच्या 'सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धे'चा गौरव सोहळा मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडला होता. वर्षावर झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमिर खान शेजारीच बसले होते. या कार्यक्रमामध्ये राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, आमिर खानची पत्नी किरण राव यांनी हजेरी लावली होती.
गेल्यावर्षी आमिर खानबरोबर काम करणारे त्याचे काही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले होते. ज्यामध्ये काही सिक्युरिटी सेवेतील कर्मचारी, ड्रायव्हर आणि घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता. आता पुन्हा एकदा बॉलिवूडभोवती कोरोनाचा विळखा वाढू लागला आहे. अलीकडेच रणबीर कपूर, संजय लीला भंसाळी, कार्तिन आर्यन, वरुण धवन, नीतू सिंह हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aamir khan