Home /News /coronavirus-latest-news /

स्वतःच्याच नादात दंग नर्सनं फोनवर बोलत-बोलत महिलेला दोनदा दिली कोरोना लस, पुढे जे घडलं ते अजबच

स्वतःच्याच नादात दंग नर्सनं फोनवर बोलत-बोलत महिलेला दोनदा दिली कोरोना लस, पुढे जे घडलं ते अजबच

एका एएनएमनं महिलेला दोनवेळा कोरोनाची लस (Two Dose of Corona Vaccine) दिली आहे. फोनमध्ये व्यग्र असणाऱ्या एएनएमनं महिलेला एकच्याऐवजी दोनवेळा कोरोना लस दिली

    नवी दिल्ली 03 एप्रिल : देशात कोरोनाची दुसरी लाट (Coronavirus in India) आली असून रुग्णसंख्येत सातत्यानं वाढ होत आहे. कोरोनासोबत लढा देण्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला (Corona Vaccine) गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. मात्र, देशात चिंताजनक परिस्थिती असतानाही कधी आरोग्य कर्मचारी तर कधी सामान्य नागरिकांचा हलगर्जीपणा समोर येत आहे. कानपूर देहातमधून आता अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. जिथे एका एएनएमनं महिलेला दोनवेळा कोरोनाची लस (Two Dose of Corona Vaccine) दिली आहे. कानपूर देहातच्या मडौली पीएचसीमध्ये कोरोनाची लस दिली जात आहे. कमलेश देवी नावाची महिला याठिकाणी लस घेण्यासाठी गेली. यादरम्यान फोनमध्ये व्यग्र असणाऱ्या एएनएमनं महिलेला एकच्याऐवजी दोनवेळा कोरोना लस दिली. महिलेनं तक्रार केल्यानंतर एएनएमनं आपली चूक मान्यही केली. मात्र, महिलेच्या कुटुंबीयांनी यानंतर एकच गोंधळ घातला. कमलेश देवी यांनी सांगितलं, कि एएनएम आपल्या मोबाईलवरुन कोणासोबत तरी बोलत होती. तिनं फोनवर बोलत बोलतच मला लस दिली. मी तिथंच बसून राहिले आणि तिनंदेखील मला तिथून उठण्यास सांगितलं नाही. फोनवर बोलताना ती हे विसरली की तिनं आधीही मला एकदा लस दिली आहे आणि तिनं मला पुन्हा एकदा लस दिली. यानंतर कमलेश देवींनी विचारणा केली, की लस दोनवेळा दिली जाते का? यावर नर्सने नाही एकदाच दिली जाते, असं उत्तर दिलं. यानंतर महिलेनं सांगितलं, की तुम्ही मला दोनवेळा लस दिली आहे. यानंतर उलट नर्सच महिलेवर ओरडायला लागली आणि तू उठून का गेली नाही, असा प्रश्न करू लागली. यानंतर महिलेनं सांगितलं, की तुम्ही मला जाण्यासाठी सांगितलं नाही. मला याची माहिती नव्हती की एक लस घ्यायची की दोन. यानंतर कमलेश देवी यांचा हात भरपूर सूजला. या घटनेची माहिती कुटुंबीयांना मिळताच त्यांनी एकच गोंधळ केला. या घटनेची माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी कारवाईचं आश्वासन देत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. कानपूर देहातचे सीएमओ राजेश कुमार यांनी फोनवरुन अशी माहिती दिली, की डीएम साहेबांनी प्रकरणाची गंभीरतेनं चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत अधिक माहिती देताना कमलेश देवी यांच्या मुलानं सांगितलं, की त्यांच्या आईची प्रकृती सध्या ठीक आहे. जिथे लस देण्यात आली होती तिथे हात सूजला आहे. सीएमओ राजेश कुमार यांचं असं म्हणणं आहे, की एका व्यक्तीला दोनवेळा लस दिली जात नाही आणि हे शक्यही नाही. याप्रकरणाच्या चौकशीसाठी एक टीम बनवण्यात आली असून चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत. अहवाल समोर आल्यानंतर याबाबत कठोर कारवाई केली जाईल. हा अत्यंत मोठा हलगर्जीपणा असून यामुळे मोठी दुर्घटनाही घडून शकते, असंही त्यांनी म्हटलं आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Corona vaccination, Corona vaccine, Covid-19, Shocking news

    पुढील बातम्या