कोरोनाच्या अँटीबॉडीजबाबत खुशखबर, वाचा काय म्हणतंय नवं संशोधन...

कोरोनाच्या अँटीबॉडीजबाबत खुशखबर, वाचा काय म्हणतंय नवं संशोधन...

कोरोनाचा संसर्ग आणि मानवी प्रतिकारशक्तीबाबत जगभरात सतत संशोधन होते आहे. नुकतेच झालेले एक संशोधन गुड न्यूज देत आहे.

  • Share this:

मुंबई, 27 डिसेंबर : सगळं जग सध्या अक्षरश: श्वास रोखून कोरोनावरच्या (corona) अचूक लागू पडणाऱ्या लशीची वाट बघत आहे. सोशल डिस्टन्सिंग (social distancing) आणि मास्कचा (mask) वापर करण्याचं आवाहन सतत केलं जात आहे.

एकदा कोरोना होऊन गेला, की शरिरात अँटीबॉडीज (antibody) तयार होतात. या अँटीबॉडीज कोरोनाचा दुसऱ्यांदा संसर्ग (infection)  होण्यापासून त्या व्यक्तीचा बचाव करतात असा एक समज प्रचलित आहे. मात्र या अँटीबॉडीज साधारण किती काळ मानवाला संरक्षण देऊ शकतात याबाबत सतत संशोधन सुरू आहे. संशोधक, विषाणूतज्ञ आणि शास्त्रज्ञ सांगतात, की या गोष्टीभोवती तयार झालेलं संशयाचं धुकं अजूनही हटलेलं नाही. केवळ काही महिनेच अँटीबॉडीज कार्यक्षम राहतात त्यामुळे दुसऱ्यांदा संसर्ग होण्याचा धोका कायम राहतो असं या सगळ्यांनी बजावलं आहे.

आता ऑस्ट्रेलियातील मोनॅश युनिव्हर्सिटीतील (Monash University) शास्त्रज्ञांच्या टीमनं जगाला एका नवीन अभ्यासाद्वारे जणू ख्रिसमसची भेट दिली आहे. हा अभ्यास सांगतो आहे, की कोरोनाव्हायरसचा संसर्ग एकदा होऊन गेल्यावर तयार होणारी इम्युनिटी अर्थात रोगप्रतिकारकशक्ती किमान 8 महिने टिकून राहते. weather.com या साइटनं साबाबतचं वृत्त दिलं आहे.

याबाबत बोलताना मोनॅश युनिव्हर्सिटीतील इम्युनॉलॉजिस्ट मेनो वॉग झेल्म म्हणाले, "इम्युनिटीचा मुद्दा अनेकांच्या डोक्यावर चिंतेचा ढग बनून तरंगतो आहे. आता आमचं संशोधन हे अनेकांना नवी उमेद देणारं ठरणार आहे. आता तयार होणारी लस हीसुद्धा दीर्घकाळ टिकणारी इम्युनिटी विकसित करणारी असेल."

आपल्या प्रतिकार यंत्रणेमधील खास प्रकारच्या पेशी ज्यांना मेमरी बी सेल्स किंवा MBC म्हटलं जातं, त्यांच्यावर हे संशोधन करण्यात आलं. मानवी शरीरात झालेला कोणताही संसर्ग लक्षात ठेवण्याची क्षमता या पेशींमध्ये असते. जर पुन्हा एकदा संसर्ग झाला, तर  MBC या त्यांच्या मेमरीद्वारे प्रोटेक्टिव इम्यून रिस्पॉन्स देतात.

मागे चीनच्या चॉन्गक्विंग मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये असेच एक संशोधन करण्यात आले होते. यात असे निष्पन्न झाले, की कोविड 19  झालेल्या व्यक्तींमध्ये तयार झालेल्या अँटीबॉडीज पुढील 2-3 महिन्यात कमी व्हायला सुरू झाल्या.

Published by: News18 Desk
First published: December 27, 2020, 9:49 PM IST

ताज्या बातम्या