कोरोना संसर्गाच्या गतीत मोठी वाढ; अवघ्या 39 दिवसांत 2 वरून रुग्णसंख्या 3 कोटींच्या पार

कोरोना संसर्गाच्या गतीत मोठी वाढ; अवघ्या 39 दिवसांत 2 वरून रुग्णसंख्या 3 कोटींच्या पार

WHO शी संबंधित वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की कोरोनाचा संसर्ग सध्या सुरुवातीच्या काळात आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 17 सप्टेंबर : जगभरात कोरोना संसर्गाचा (Coronavirus) कहर थांबायचे नाव घेत नाही. बुधवारी कोरोनाच्या (Covid-19) आकड्यांनी एक नवा रेकॉर्ड केला आहे. आता जगभरात एकूण संसर्गांची संख्या वाढून 3 कोटींपेक्षा जास्त झाली आहे. कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या आता 2 कोटी 17 लाखांहून जास्त झाली आहे. तर कोरोना महासाथीत मृत्यू होणाऱ्यांची संख्या 9 लाख 44 हजारांहून अधिक झाली आहे.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 2 कोटीपर्यंत असणारी कोरोना रुग्णांची संख्या अवघ्या 39 दिवसांत 3 कोटींच्या पार गेली आहे. म्हणजे संसर्गाची गती आता सर्वात जास्त आहे. साधारण 100 वर्षांपूर्वी फ्लूमुळे 50 कोटी जणांना संसर्ग झाला होता. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिजीज कंट्रोल आणि प्रिव्हेंशननुसार 1918-19 मध्ये एन्फ्लुएंजामुळे जगातील 50 कोटी लोकांना संसर्ग झाला होता. त्यावेळी जगात एक तृतीयांश लोकसंख्येला संसर्ग झाला होता. मात्र अद्याप कोरोनाचा कहर इथपर्यंत पोहोचलेला नाही. WHO शी संबंधित वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की कोरोनाचा संसर्ग सध्या सुरुवातीच्या काळात आहे.

हे ही वाचा-Coronavirus : भारतात कोरोनाची दुसरी लाट येणार? जाणून घ्या सत्य

यूएनच्या प्रमुखांनी व्यक्त केली भीती

यादरम्यान यूएनचे सेक्रेटरी जनरल एंटोनिया गुटरेस यांनी सांगितले की, जगभरात कोरोनाची गंभीर परिस्थिती आहे. ते पुढे म्हणाले की, जर कोविड - 19 शी लढायचं असेल तर जगातील सर्व देशांना एकत्र यायला हवं. आणि एकत्र येऊन या महासाथीशी लढावं लागेल. यूएन प्रमुखांनी सांगितले की, सध्याच्या काळात जगाला सर्वात मोठा धोका कोणता असेल तर तो कोरोना व्हायरस महासाथीशी आहे. यापूर्वी संयुक्त राष्ट्र महासभाचे नवे अध्यक्ष वोल्कन बोजकिर यांनी बहुपक्षवादाला जगातील सर्व समस्यांवरील उपाय असल्याचे सांगितले.

देशातील कोरोनाचा आतापर्यंतचा आकडा 50 लाख पार झाला असून 51 लाख 18 हजार 254 रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे 24 तासांत 1 हजार 132 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांचा आकडा 83 हजार 198 वर पोहोचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनातून बरे झालेल्या लोकांची संख्याही 40 लाखांहून अधिक आहे. आतापर्यंत 40 लाख 25 हजार 80 रुण बरे झाले असून बुधवारी विक्रमी 82 हजार 922 लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. देशात सध्या 10 लाख 9 हजार 976 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Published by: Meenal Gangurde
First published: September 17, 2020, 3:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading