Home /News /coronavirus-latest-news /

Lockdown मध्ये माणसांसोबत कुत्राही खेळतोय Volleyball, VIDEOपाहून कराल कौतुक

Lockdown मध्ये माणसांसोबत कुत्राही खेळतोय Volleyball, VIDEOपाहून कराल कौतुक

माणसांनी त्यांचा एकटेपणा घालवण्यासाठी प्राण्यांशी मैत्री करावी असा सल्ला अनेक डॉक्टरांनीही दिला आहे. त्यामुळे सध्याच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ पसंती मिळवून जात आहे.

    नवी दिल्ली 20 जुलै: माणूस आणि कुत्र्यांचं विशेष नातं असतं. माणसांचा उत्तम मित्र आणि रक्षणकर्ता म्हणूनही त्याची ओळख आहे. लॉकडाऊनच्या काळात एकटेपणा घालवण्यासाठी सगळ्यांना जवळचा वाटला तो आपल्या घरचा कुत्रा. अशा एका कुत्र्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा कुत्रा आपल्या मालकांसबोत हॉलिबॉल खेळत असून एखाद्या कसलेल्या खेळाडूप्रमाणे तो खेळतांना दिसत आहे. मैदानावर चार जण हॉलिबॉल खेळत असून एका बाजूला मालकासोबत त्याचा कुत्राही आहे. हा कुत्रा अतिशय चपळपणे पूर्ण मैदानावर नजर ठेवून आहे. बॉल आल्यावर उडी मारून तो त्या बॉलला परतवूनही लावतांना दिसतो आहे. अनुभवी खेळाडूप्रमाणे तो मैदानावर वावरतांना दिसत असल्याने नेटकरीही त्याचं कौतुक करतांना दिसत आहेत. भारतीय वनखात्यातले अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून लोकांनी त्या कुत्र्याला चांगलीच दाद दिली आहे. तब्बल 27 हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओपाहून त्या कुत्र्याचं कौतुक केलं आहे. कोरोनाच्या संकट काळात कुत्रा आणि माणसांच्या प्रेमाच्या अनेक गोष्टी पुढे आल्या होत्या.  कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या मालकाची वाट पाहणं असतो की घरात एकट्या असलेल्या वृद्ध मालकीनीची देखभाल करणं असतो अशा अनेक गोष्टींमध्ये कुत्र्याने मदत केल्याचं पुढे आलं होतं. माणसांनी त्यांचा एकटेपणा घालवण्यासाठी प्राण्यांशी मैत्री करावी असा सल्ला अनेक डॉक्टरांनीही दिला आहे. त्यामुळे सध्याच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ पसंती मिळवून जात आहे. संपादन - अजय कौटिकवार
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Lockdown

    पुढील बातम्या