मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

नियम तोडून लग्नसमारंभात सहभागी होणं भोवलं; 95 जणांना कोरोनाची लागण, नवरीच्या वडिलांचा मृत्यू

नियम तोडून लग्नसमारंभात सहभागी होणं भोवलं; 95 जणांना कोरोनाची लागण, नवरीच्या वडिलांचा मृत्यू

ब्लड गृप ‘ए’ आणि ‘बी‘  असण्यांना कोरोना संक्रमाणाचा धोका जास्त आहे.

ब्लड गृप ‘ए’ आणि ‘बी‘ असण्यांना कोरोना संक्रमाणाचा धोका जास्त आहे.

लग्नसमारंभांमध्ये (Marriage Functions) सामील झालेल्या 150 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील 95 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह (Corona Positive) आला आहे.

  • Published by:  Kiran Pharate

जोधपूर 21 मे: कोरोनानं (Coronavirus) रौद्ररुप धारण करुन देशात एकच हाहाकार उडवला आहे. याच कोरोनामुळे एका छोटाशा गावात (Corona Spread in Rural Area) खळबळ उडाली आहे. राजस्थानमधील एका गावात एकाच दिवशी 95 जणांना कोरोना झाल्यानं चिंतेचं वातावरण पसरलं आहे. झुंझनू जिल्ह्यातील तीन लग्नसमारंभांमध्ये (Marriage Functions) सामील झालेल्या 150 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील 95 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह (Corona Positive) आला आहे. इतकंच नाही तर याच काळात नवरीच्या वडिलांचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे आसपासच्या गावांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

स्यालू कल गावात राहाणाऱ्या सुरेंद्र शेखावत यांनी सांगितलं, की जेव्हा लोकांची कोरोना चाचणी केली गेली, तेव्हा ९५ जण पॉझिटिव्ह आले. 25 एप्रिलला तीन लग्न होती आणि याच दरम्यान नवरीच्या वडिलांचाही मृत्यू झाला. सुरुवातील गावातील लोक कोरोनाला घाबरत नव्हते आणि सर्रास फिरत होते. मात्र, जेव्हा प्रत्येकाची चाचणी केली गेली, तेव्हापासून गावात भीतीचं वातावरण आहे आणि सर्वजण आपल्या घरांमध्ये थांबत आहेत. इतकंच नाही तर आता अधिकारीही या गावात येण्यास घाबरत असल्याचं त्यांनी सांगितलं.

गावात एकच शांतता पसरली आहे. रस्ते मोकळे आहेत. लहान मुलं घरामध्ये बंद आहेत आणि लोक केवळ आवश्यक कामासाठीच बाहेर निघत आहेत. राजस्थान सरकारनं लग्नसमारंभात केवळ अकराच लोकांना सामील होण्यास परवानगी दिली आहे. हा नियम तोडल्यास एक लाख दंडचा शिक्षाही आहे. मात्र, असं असतानाही लोकांनी या नियमांकडे दुर्लक्ष केल. याचा फटका इतरांनाही बसला.

गावातील लोकांचं असं म्हणणं आहे, की लग्नामधील गर्दीमुळेच आज ही परिस्थिती उद्भवली आहे. लोकांचा असा गैरसमज होता, की कोरोना केवळ शहरातच आहे. त्यामुळे, सगळेच निष्काळजी होते. मात्र, आता गावात एकापाठोपाठ होणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूमुळे सगळ्यांनाच चिंतेत टाकलं आहे. आता लोकांना याचं गांभीर्य समजलं असून लोक आता योग्य ती काळजी घेत आहेत.

First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus, Marriage