Home /News /coronavirus-latest-news /

मधुमेह-हृदयविकार असूनही काही वाकडं करू शकला नाही कोरोना, 92 वर्षीय आजोबा झाले ठणठणीत

मधुमेह-हृदयविकार असूनही काही वाकडं करू शकला नाही कोरोना, 92 वर्षीय आजोबा झाले ठणठणीत

मधुमेह आणि रक्तदाब यांसारखे (diabetes and heart disease) गंभीर आजार असूनही मनमाडमधील एका 92 वर्षीय वयोवृद्धानं (92 year old man) कोरोनावर यशस्वी मात (Recovered) केली आहे.

मनमाड, 08 मे: गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना विषाणूचा संसर्ग (Corona pandemic) वेगानं वाढत आहे. कोरोना विषाणूची दुसरी लाट (Corona 2nd wave) अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांसाठी सर्वांसाठीचं अत्यंत घातक ठरत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून देशात हजारो लोकांचे हकनाक मृत्यू (Corona patients death) होतं आहेत. अशात आशेचा किरण दाखवणारी बातमी समोर आली आहे. मधुमेह आणि रक्तदाब यांसारखे (diabetes and heart disease) गंभीर आजार असूनही मनमाडमधील एका 92 वर्षीय वयोवृद्धानं (92 year old man) कोरोनावर यशस्वी मात (Recovered) केली आहे. जगण्याची प्रबळ इच्छाशक्ती आणि उमेदीच्या जोरावर या आजोबांनी कोरोनारुपी आलेल्या  यमराजलाही आल्या पावली परत पाठवलं आहे. या आजोबांना अनेक वेगवेगळ्या आजारांनी ग्रासलं आहे. केवळ आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून त्यांनी कोरोनाला हरवलं आहे. नामदेव शिंदे असं या 92 वर्षीय वयोवृद्ध आजोबांच नाव आहे. त्यांना एक वर्षापूर्वी हृदय विकाराचा जोरदार झटकाही येऊन गेला आहे. हृदयविकारातून सहीसलामत बाहेर पडल्यानंतर दुर्दैवानं ते बाथरूममध्ये पाय घसरून पडले. यामुळे त्यांच्या खुब्याची शस्त्रक्रिया करावी लागली. हे वाचा-कोविड रुग्णालयात दाखल होण्याच्या नियमात बदल; मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय एवढंच नव्हे तर, त्यांना रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास देखील आहे. विशेष म्हणजे मधुमेह, रक्तदाब किंवा हृदयविकार यासारखे गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांसाठी कोरोना विषाणू अत्यंत घातक ठरतो. असं असतानाही या आजोबानं कोरोनावर यशस्वी मात केली आहे. हे आजोबा काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत सापडले आणि त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. अगोदरच वेगवेगळे आजार आणि आता कोरोना झाल्याने घरातील मंडळींची चिंता वाढली होती. हे वाचा-बाबा, माझ्या उपचारासाठी खर्च केला तर पम्मीचं लग्न कसं होईल? ते शब्द ठरले अखेरचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आजोबांना एका खाजगी डॉक्टरांकडे नेण्यात आलं. त्याठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना शासकीय रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. कोरोना उपचाराला या आजोबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि काही दिवसांतच सुखरुप घरीही परतले आहेत.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Corona patient, Nashik

पुढील बातम्या