मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Corona Vaccination : 18 + लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर, 'या' राज्यानं घेतली आघाडी

Corona Vaccination : 18 + लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर, 'या' राज्यानं घेतली आघाडी

तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी 18 ते 44 या वयोगटातील साडेतीन करोड लोकांनी आपलं नाव नोंदवलं (Registration for Corona Vaccine) आहे. मात्र, आतापर्यंत यातील 2 टक्क्याहून कमी लोकांना लस मिळाली आहे.

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली, 06 मे : 18 वर्षावरील सर्वांना 1 मेपासून लस (Corona Vaccine) दिली जात आहे. यासाठीच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेला (Online Registration for Corona Vaccine) 28 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. याअंतर्गत 18 ते 44 या वयोगटातील साडेतीन करोड लोकांनी आपलं नाव नोंदवलं आहे. मात्र, आतापर्यंत यातील 2 टक्क्याहून कमी लोकांना लस मिळाली आहे. देशात लसीकरण मोहिमेला (Covid Vaccination) जानेवारी महिन्यापासून सुरुवात झाली आहे. तेव्हापासून एका आठवड्यात इतक्या मोठ्या प्रमाणात रजिस्ट्रेशन होण्याची ही पहिलीच वेळ आहे. देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू असून यात कोरोनानं तरुणांनाही आपल्या विळख्यात घेतलं आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्य आणि खासगी रुग्णालयांनी लसीचा अधिकचा स्टॉक न ठेवल्यानं तुटवडा जाणवत आहे. यामुळे आतापर्यंत केवळ 6.62 लाख लोकांनाच कोरोनाची पहिली लस मिळाली आहे. ही संख्या 1 मे ते 4 मे या काळातील आहे. हा आठवडा सांभाळा! सर्वोच्च आकडेवारीचा 'हाय अलर्ट',नंतर अशी कमी होणार रुग्णसंख्या सर्वाधिक लसीकरण गुजरातमध्ये - देशभरातील जवळपास 12 हून अधिक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या राज्यांनी आधीच सिरम आणि भारत बायोटेककडे लसीची ऑर्डर दिली होती. भाजपची सत्ता असलेल्या गुजरातमध्ये सर्वाधिक लसीकरण झालं आहे. गुजरातनं आतापर्यंत जवळपास 1.61 जणांना लस दिली असून 25 टक्के लसीकरण एकट्या गुजरातनं केलं आहे. यानंतर काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थानचा नंबर आहे. राजस्थानमध्ये आतापर्यंत 1.26 लोकांना लस दिली आहे. तर, महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणात आतापर्यंत 1.11 लाख जणांना लस देण्यात आली आहे. गुजरात आणि राजस्थानमध्ये कोविशिल्ड या लसीचाच वापर केला जात आहे. तर, महाराष्ट्रात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन हे दोन्ही पर्याय दिले जात आहेत. दुसरीकडे हरियाणामध्ये जवळपास एक लाख जणांना लस दिली गेली आहे. इथेही केवळ कोविशील्ड लस दिली जात आहे. दिल्लीमध्ये जवळपास 80 हजार जणांना लस दिली गेली आहे. इथे कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन हे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत 51,236 जणांना लसीचा पहिला डोस दिला गेला आहे. राज्याकडे सध्या फक्त कोव्हॅक्सिनचा स्टॉक आहे.
First published:

Tags: Corona vaccination, Corona vaccine, Corona virus in india

पुढील बातम्या