मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

पालकांनो Alert! 5 वर्षांच्या चिमुकलीचा कोरोनाने घेतला बळी; नव्या लाटेचा धोका वाढला?

पालकांनो Alert! 5 वर्षांच्या चिमुकलीचा कोरोनाने घेतला बळी; नव्या लाटेचा धोका वाढला?

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये कोरोनाने एका चिमुकलीचा बळी घेतल्याने कोरोनाच्या नव्या लाटेची धास्ती वाढली आहे.

  • Published by:  Priya Lad

अहमदाबाद, 21 एप्रिल : कोरोना नियंत्रणात आला असं कुठे आता वाटत होतं. सरकारनेही सुटकेचा निश्वास टाकत नागरिकांना लॉकडाऊन, मास्क या कोंडीतून सोडवत मोकळा श्वास घ्यायला दिला. अशात आता एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. कोरोनाच्या नवे व्हेरिएंट, कोरोनाची वाढती प्रकरणं, कोरोनाच्या नव्या लाटेचं (Corona new wave) संकट या बातम्या कानावर येत असताना आता कोरोनाने एका चिमुकलीचा बळी घेतल्याची बातमी समोर आली आहे (Corona infected children died in Gujrat).

गुजरातमध्ये कोरोनामुळे एका लहान मुलीचा मृत्यू झाला आहे. जामननगरमधील 5 वर्षांची ही मुलगी आहे. तिच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं होती. त्यामुळे तिच्या मृत्यूमुळे आता धास्ती वाढली आहे. तिला कोरोनाच्या कोणत्या व्हेरिएंट्सची लागण झाली होती हे तपासण्यासाठी नमुने जीनोम सीक्वेंससाठी पाठवण्यात आले आहेत.

लहान मुलांना Omicron XE व्हेरिएंटचा सर्वात जास्त धोका

भारतावर कोरोनाच्या चौथ्या लाटेचं संकट घोंगावत आहे. या लाटेला ओमायक्रॉन XE  (Omicron XE) आणि बीए 2 (BA2 variant) हे दोन व्हेरिएंट कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. कारण हे व्हेरिएंट आतापर्यंतचे सर्वांत जास्त वेगाने प्रसार होणारे व्हेरिएंट आहेत.

हे वाचा - 5-12 वयोगटातील Child Corona vaccination चा मार्गही मोकळा; Corbevax Vaccine ला मंजुरी

कोरोनाच्या बीए1 आणि बीए2 या दोन व्हेरिएंट्सचे एकत्रित हायब्रिड असे रूप म्हणजे ओमाक्रॉन XE. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पूर्वीच्या व्हेरिएंट्सच्या तुलनेत हा व्हेरिएंट 10 पट अधिक संसर्गजन्य (Omicron XE more transmissible) आहे. त्यामुळेच लसीकरण न झालेल्या लोकांसाठी हा विषाणू मोठ्या प्रमाणात घातक ठरू शकतो.

5-12 वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी हालचाली

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता आता मोदी सरकारने 5-12 वयोगटातील मुलांच्या कोरोना लसीकरणासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. 5-12 वयोगटातील मुलांनाही लवकरच कोरोना लस दिली जाणार आहे. कोर्बेवॅक्स (Corbevax Vaccine) या कोरोना लशीच्या आपात्कालीन वापराला केंद्राकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे.

हे वाचा - Corona Spread : 'या' देशात कोरोनाची स्थिती पुन्हा गंभीर, घराबाहेर पडण्यासही बंदी

ड्रग्ज कंट्रोरल जनरल ऑफ इंडियाच्या (DCGI) एक्सपर्ट कमिटीने 5 ते 12 वयोगटातील मुलांना कोर्बेवॅक्स देण्यास मंजुरी दिली आहे. समितीने डीसीजीआयकडे याबाबत शिफारस पाठवली आहे. आता DCGI कडून मंजुरीची प्रतीक्षा आहे. त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून अंतिम परवानगी मिळेल.

First published:

Tags: Coronavirus