मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

सर्दीची लक्षणं दिसली म्हणून 3 वर्षांची चिमुरडी एकटीच गेली डॉक्टरांकडे, पाहा काय म्हणाली..

सर्दीची लक्षणं दिसली म्हणून 3 वर्षांची चिमुरडी एकटीच गेली डॉक्टरांकडे, पाहा काय म्हणाली..

मोठ्या माणसांमध्ये जागरूकतेचा अभाव असल्याची अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला असताना लहान मुलांकडून मात्र प्रगल्भता दाखवली गेल्याची उदाहरणं दिसत आहेत

मोठ्या माणसांमध्ये जागरूकतेचा अभाव असल्याची अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला असताना लहान मुलांकडून मात्र प्रगल्भता दाखवली गेल्याची उदाहरणं दिसत आहेत

मोठ्या माणसांमध्ये जागरूकतेचा अभाव असल्याची अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला असताना लहान मुलांकडून मात्र प्रगल्भता दाखवली गेल्याची उदाहरणं दिसत आहेत

  • Published by:  Meenal Gangurde

नागालँड, 5 जून : गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ कोरोना आपल्यासोबत आहे. आपल्याला आता अजून काही काळ त्याच्यासोबत राहण्यावाचून पर्याय नसल्याने तोंडाला मास्क लावणं, दुखणी अंगावर न काढणं अशा सूचना सर्व यंत्रणांकडून वेळोवेळी आपल्याला दिल्या जात आहेत. तरीही सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावलेल्यांकडून लाखो रुपयांचा दंड वसूल केल्याच्या बातम्या आपण वाचतो. लक्षणं दिसत असूनही ती किरकोळ म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष (Reluctance) केल्यामुळे गंभीर स्थिती ओढवून रुग्ण मृत्युमुखी पडल्याचं आपण ऐकतो. मोठ्या माणसांमध्ये जागरूकतेचा अभाव असल्याची ही उदाहरणं आपल्या आजूबाजूला असताना लहान मुलांकडून मात्र प्रगल्भता दाखवली गेल्याची उदाहरणं दिसत आहेत. तसंच एक उदाहरण नुकतंच नागालँडमध्ये (Nagaland) पाहायला मिळालं.

नागालँड हे दुर्गम, ग्रामीण राज्य. या राज्यातल्या झुन्हेबोटो जिल्ह्याच्या घठाशी तालुक्यातल्या हेबोलिमी हेल्थ सेंटरमध्ये नुकतीच तीन वर्षांची एक मुलगी आली. लिपावी हे तिचं नाव. तिच्यासोबत तिचे पालक किंवा कोणीही नव्हतं. मास्क वगैरे लावून आलेल्या लिपावीला पाहून आणि तिची चौकशी केल्यानंतर मिळालेल्या उत्तरांनी त्या आरोग्य केंद्रातले कर्मचारी आणि डॉक्टरांना धक्काच बसला.

तिला रात्रीपासून सर्दीसारखी लक्षणं (Common Cold) जाणवत होती; पण तिचे आई-वडील सकाळी लवकर शेतात गेले होते. त्यामुळे शेवटी तिने एकटीनेच घराजवळच असलेल्या आरोग्य केंद्रात जायचं ठरवलं, असं 'दी मोरंग एक्स्प्रेस' या वृत्तपत्रात म्हटलं आहे. त्या हवाल्याने 'दी इंडिय एक्स्प्रेस'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

हे ही वाचा-महिला खासदाराच्या 'विचित्र' कपड्यांवरुन अध्यक्षांनी काढलं संसदेच्या बाहेर

तिने किरकोळ लक्षणं असूनही दुर्लक्ष केलं नाही आणि तपासणीसाठी जाताना मास्क घालायला ती विसरली नाही. त्या केंद्रातल्या कम्युनिटी हेल्थ ऑफिसरनी (Community Health Officer) तिला तपासलं आणि औषधं दिली. तिचं कौतुकही केलं. नागालँडच्या भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष बेंजामिन येप्थोमी (Benjamin Yepthomi) यांनी ही मुलगी आरोग्य केंद्रातल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोलतानाचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. तसंच त्या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनाही टॅग केलं आहे.

फक्त तीनच वर्षांची मुलगी एकटीच आरोग्य केंद्रात (Health Centre) कशी जाऊ शकते, अशी शंका काही ट्विटर युझर्सनी व्यक्त केली आहे. त्यावर बेंजामिन यांनी उत्तर दिलं, की 'ती दुर्गम गावातली असून, तिथे आरोग्य केंद्र तिच्या घरापासून अगदी सहज चालत जाण्याएवढ्या अंतरावर आहे.'

'जेव्हा मोठी माणसं कोरोनाची चाचणी करून घेण्यास किंवा लसीकरण करून घेण्यास टाळाटाळ करताना आपण पाहतो, तेव्हा लहानग्या, निरागस लिपावीकडे पाहून दिलासा मिळतो. जबाबदारीने वागणं ही काळाची गरज आहे,' असं बेंजामिन यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे.

ट्विटर युझर्सनी लिपावीवर (Lipavi) अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. मोठ्या माणसांनी या प्रकारची जागरूकता आणि जबाबदारी दाखवली पाहिजे, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली आहे.

एवढ्या छोट्याशा खेड्यात राहूनही आपल्या मुलीला चांगली शिकवण दिल्याबद्दल अनेकांनी तिच्या पालकांचंही कौतुक केलं आहे.

'लोक डॉक्टरांवर हल्ला करत असल्याच्या अनेक बातम्या अलीकडे ऐकू येतात. त्या पार्श्वभूमीवर ही मुलगी अगदी दिलखुलासपणे आपल्या आरोग्याविषयी डॉक्टरशी बोलत असतानाचा हा फोटो मानसिक आधार वाढवणारा आहे,' अशी प्रतिक्रिया एका डॉक्टरने व्यक्त केली आहे. 'मोठ्यांनी तिच्याकडून शिकावं,' अशी अपेक्षा तर अनेकांनी व्यक्त केली आहे.

First published: