मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

कोरोनाची परिस्थिती भयावह! एकाच दिवसात भाजप आणि काँग्रेसच्या 3 आमदारांचा मृत्यू

कोरोनाची परिस्थिती भयावह! एकाच दिवसात भाजप आणि काँग्रेसच्या 3 आमदारांचा मृत्यू

देशभरात साथीच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाने थैमान घातले आहे. यामध्ये 24 तासांत देशातील तीन आमदारांचा मृत्यू झाला आहे. यात भाजपच्या दोन आणि काँग्रेसच्या एका महिला आमदाराचा समावेश आहे. कोरोना संसर्ग झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून तिन्ही आमदारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 24 एप्रिल : देशभरात साथीच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाने (Second Wave of Coronavirus) थैमान घातले आहे. यामध्ये 24 तासांत देशातील तीन आमदारांचा (3 MLAs died of Coronavirus in 24 hours) मृत्यू झाला आहे. यात भाजपच्या दोन आणि काँग्रेसच्या एका महिला आमदाराचा समावेश आहे. कोरोना संसर्ग झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून तिन्ही आमदारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते व्हेंटिलेटरवर होते. भाजपचे आमदार सुरेश श्रीवास्तव, रमेशचंद्र दिवाकर आणि काँग्रेस आमदार कलावती भूरिया अशी त्यांची नावे आहेत.

उत्तर प्रदेशचे दोन आमदार

लखनऊमधील पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार सुरेश श्रीवास्तव (Suresh Shrivastav) यांचे शुक्रवारी रात्री उशिरा निधन झाले. त्यांच्यावर पीजीआयमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या पत्नी आणि मुलालाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. श्रीवास्तव हे लखनऊचे आमदार होते. पक्षाचे एकनिष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी बूथ अध्यक्ष, मंडळाचे अध्यक्ष ते राज्यमंत्री या पदावर जबाबदारी सांभाळली.

औरैया जिल्ह्यातील भाजपचे आमदार रमेशचंद्र दिवाकर (Rameshchandra Diwakar) यांनाही कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर मेरठच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी मेरठमधील मेडिकल कॉलेजमध्ये त्यांचे निधन झाले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आमरांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले.

(हे वाचा - न्यायमूर्ती NV Ramana देशाचे नवे सरन्यायाधीश, राष्ट्रपतींनी दिली शपथ)

मध्य प्रदेशच्या काँग्रेस आमदार

मध्य प्रदेशच्या अलीराजपूर जिल्ह्यातील जोबट विधानसभा मतदारसंघातील आमदार आणि काँग्रेस नेत्या कलावती भूरिया (Kalawati Bhuriya) यांचाही कोरोना संसर्गाने मृत्यू झाला. त्यांच्यावर इंदूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथे पहाटे तीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना गेल्या 10 दिवसांपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कलावती भूरिया या झाबुआचे आमदार कांतीलाल भूरिया यांच्या भाची असून त्यांनी 15 वर्षे झाबुआ जिल्हा पंचायत अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांचे भाऊ आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विक्रांत भूरिया यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली.

First published:

Tags: Corona patient, Corona spread, Coronavirus cases