• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • Corona : मृतदेह दफन करण्यासाठी 150 जणांची उपस्थिती, गावात 21 बाधितांचा आतापर्यंत मृत्यू

Corona : मृतदेह दफन करण्यासाठी 150 जणांची उपस्थिती, गावात 21 बाधितांचा आतापर्यंत मृत्यू

प्रोटोकॉल न पाळता कोरोनाबाधिताचा मृतदेह पुरण्यासाठी तब्बल 150 लोक जमा झाले होते. यातील अनेकांनी या मृतदेहाला स्पर्शही केला होता. यानंतर या मृत्यूंची सुरुवात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

 • Share this:
  जयपूर, 09 मे : राजस्थानमधील (Rajastan Corona Update) सीकर जिल्ह्यातील खीरवा गावात गेल्या 21 दिवसांत 21 जणांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला आहे. प्रोटोकॉल न पाळता कोरोनाबाधिताचा मृतदेह पुरण्यासाठी तब्बल 150 लोक जमा झाले होते. यातील अनेकांनी या मृतदेहाला स्पर्शही केला होता. यानंतर या मृत्यूंची सुरुवात झाल्याचे सांगण्यात येत आहे. गावामध्ये कोरोनाच्या फैलावामुळे (Corona Infection) आतापर्यंत एकापाठोपाठ एक मृत्यू होत आहेत. मात्र, 15 एप्रिल ते 5 मे दरम्यान गावात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे केवळ चार मृत्यू झाले, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अधिकाऱ्यांच्या मते, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे या खेड्यातील एका व्यक्तीचा गुजरातमध्ये मृत्यू झाला. 21 एप्रिलला त्याचा मृतदेह खेरावा गावात आणण्यात आला. त्याच्या अंत्ययात्रेला सुमारे 150 जण उपस्थित होते. यावेळी कोरोना प्रोटोकॉलचे मुळीच पालन झाले नाही. मृत शरीर बॅगमधून येथे आणण्यात आले होते. परंतु, लोकांनी मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीतून बाहेर काढले. बर्‍याच जणांनी या प्रक्रियेत मृतदेहाला स्पर्शही केला, असे ते म्हणाले. हे वाचा - ‘तर माझे प्राण वाचले असते’; मृत्यूच्या 1 दिवसआधी अभिनेत्यानं केली होती ही पोस्ट लक्ष्मणगड उपविभाग अधिकारी कलराज मीणा म्हणाले, 21 पैकी फक्त तीन किंवा चार जणांचा मृत्यू कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे झाला आहे. वृद्ध वयोगटात अधिक मृत्यू झाले आहेत. आम्ही ज्या कुटुंबांमध्ये मृत्यू झाले आहेत, त्या कुटुंबातील 147 लोकांचे नमुने घेतले आहेत. जेणेकरुन कोरोना विषाणूची लागण आणखीन कोणाला झाली आहे का याची माहिती मिळेल. हे वाचा - आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडलीये, कोणी फोनही उचलत नाही; केंद्रीय मंत्र्याचा योगींकडे तक्रारीचा पाढा गाव संक्रमणमुक्त करण्याचे काम प्रशासकीय कर्मचार्‍यांनी केले आहे. लोकांना रोगाच्या तीव्रतेबद्दल आणि परिस्थितीबद्दल माहिती देण्यात आली आहे. आता ते सहकार्य करीत आहेत, असे ते पुढे म्हणाले. याबाबत सीकरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय चौधरी यांनी सांगितले की, या संदर्भात स्थानिक पथकाकडून अहवाल मागविण्यात आला आहे. तो मिळाल्यानंतरच काही प्रतिक्रिया देणे शक्य होईल. खीरवा हे गाव काँग्रेस अध्यक्ष गोविंदसिंह डोटासरा यांच्या मतदारसंघात येते. या मृत्यूंबाबत त्यांनी सोशल मीडियावर माहिती दिली होती. मात्र, काही लोकांच्या आक्षेपानंतर त्यांनी ही पोस्ट डिलीट केली. डोटासरा यांनी ट्विट केले होते की, एका मृतदेहाला स्पर्श केल्यानंतर संपूर्ण गाव संकटात सापडले आहे.
  Published by:News18 Desk
  First published: