मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /मुंबईत परराज्यातून येणाऱ्या ट्रेन ठरताहेत कोरोना वाढण्याचं मुख्य कारण?

मुंबईत परराज्यातून येणाऱ्या ट्रेन ठरताहेत कोरोना वाढण्याचं मुख्य कारण?

Representative Image

Representative Image

Covid 19: राज्य सरकारनं केरळ, गोवा, गुजरात, दिल्ली, राजस्थान आणि उत्तराखंड येथून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी अनिवार्य केली.

मुंबई, 30 मे: महाराष्ट्रात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा कमी होताना दिसतोय. दरम्यान लॉकडाऊनच्या काळात राज्यात येण्यासाठी राज्य सरकारनं (Maharashtra government) नियमावली आखली. या नियमावलीत परराज्यातून येणाऱ्यांना कोविडचा नकारात्मक रिपोर्ट (Covid-negative report)किंवा राज्यात येताच टेस्ट करणं गरजेचं, असं नियम आखले. यात केरळ, गोवा, गुजरात, दिल्ली, राजस्थान आणि उत्तराखंड येथून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी अनिवार्य केली. हा नियम लागू केल्यानंतर रेल्वे पोलिसांनी (GRP)ने मुंबईत येणार्‍या 2 लाख 85 हजार प्रवाशांची चाचणी केली. यापैकी 640 कोविड पॉझिटिव्ह (Covid positive)आढळून आले असून त्यांना आयसोलेशन केंद्रात (isolation centres)पाठवण्यात आलं.

याशिवाय प्रशासनाकडून मध्य रेल्वे मार्गावर कुर्ला एलटीटी, दादर, मुंबई सीएसएमटी, कल्याण, कसारा, कर्जत आणि ठाणे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली, दादर आणि मुंबई सेंट्रल अशा अनेक स्थानकांवर थर्मल स्क्रिनिंगही करण्यात येत असल्याचं जीआरपी अधिकाऱ्यानं सांगितलं.

हेही वाचा- Petrol-Diesel Prices: जाणून घ्या मुंबईतील आजचे पेट्रोल- डिझेलचे दर

मुंबई महापालिका, ठाणे महापालिका आणि कल्याण डोंबिवली महापालिका यांच्या मदतीनं रेल्वे प्रवाशांच्या चाचण्या जीआरपीद्वारे केल्या जातात. रेल्वे प्रवास करणाऱ्या 2.85 लाख कोविड-19 च्या चाचण्या केल्या. ज्यात 640 प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं.

हेही वाचा- लसीकरणाच्या वादात अडकलेल्या अभिनेत्रीचं स्पष्टीकरण, म्हणाली...

21 मे रोजी आम्ही जवळपास 14 हजार 796 प्रवाशांच्या चाचण्या केल्या. त्यामध्ये केवळी तीन प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह आढळले, अशी माहिती अधिकाऱ्यानं दिली. पुढे त्यांनी सांगितलं, 6 मे रोजी या एका दिवसात 46 प्रवाशांना कोरोनाची लागण झाली. त्यादिवशी 8 हजार 769 प्रवाशांच्या चाचण्या घेण्यात आल्या. जीआरपी आणि पालिकेच्या मदतीनं दररोज जवळपास आठ हजार चाचण्या घेतल्या जात असल्याचंही जीआरपीच्या अधिकाऱ्यानं म्हटलं आहे.

First published:

Tags: Corona vaccination, Coronavirus