आईची एक चूक भोवली, 2 दिवसाच्या चिमुकलीला कोरोनाची लागण; अथक प्रयत्नांनंतरही झुंज अपयशी

आईची एक चूक भोवली, 2 दिवसाच्या चिमुकलीला कोरोनाची लागण; अथक प्रयत्नांनंतरही झुंज अपयशी

एका 14 दिवसाच्या चिमुकलीचा कोरोनानं मृत्यू (14 Days Old Girl Died Due to Corona) झाल्याची हृदयद्रावक घटना नुकतीच समोर आली आहे. जन्मानंतर दोन दिवसातच या चिमुकलीला कोरोनाची लागण झाली होती.

  • Share this:

अहमदाबाद 16 एप्रिल: देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत (Corona Cases in India) वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येसोबतच मृतांचे आकडेदेखील वाढत आहेत. देशातील इतर राज्यांप्रमाणेच गुजरातमध्येदेखील परिस्थिती अत्यंत भयंकर आहे. सूरतमध्ये एका 14 दिवसाच्या चिमुकलीचा कोरोनानं मृत्यू (14 Days Old Girl Died Due to Corona) झाल्याची हृदयद्रावक घटना नुकतीच समोर आली आहे. जन्मानंतर दोन दिवसातच या चिमुकलीला कोरोनाची लागण झाली होती. तिला प्लाझमादेखील चढवला गेला होता, मात्र अथक प्रयत्नांनंतरही तिला वाचवण्यात यश आलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सूरतमधील एक चिमुकली जन्माच्या दोन दिवसातच कोरोनाच्या विळख्यात आली होती. मुलीच्या आईला आधीपासूनच कोरोनाची लक्षणं होती. मात्र, तिनं याबद्दल कोणालाच माहिती दिली नाही. कोरोनाची लक्षण असतानाही ही आई आपल्या मुलीला दूध पाजत होती. याचा थेट परिणाम मुलीच्या आरोग्यावर झाला आणि तिला कोरोनाची लागण झाली.

PPE कीट घालून विश्रांती घेणाऱ्या नर्सचा फोटो व्हायरल, वाचा भावुक करणारी कथा

कोरोनावर उपचारासाठी या चिमुकलीला सूरतच्या वराछा येथील डायमंड रुग्णालयात दाखल करण्यात आलं. इथे तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले, मात्र तिचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आलं. वराछाच्या रुग्णालयात उपचारादरम्यानच ही चिमुकली कोरोनाविरोधातील लढा हारली आणि तिचा मृत्यू झाला.

कोरोनाची दुसरी लाट लहान मुलांसाठी अधिक धोकादायक असल्याचं म्हटलं जात आहे. सूरतमध्ये आतापर्यंत तीन बालकांचा मृत्यू झाला आहे. एक दिवस आधीच सूरतमधील न्यू सिव्हिल रुग्णालयातील 14 दिवसाच्या मुलानंही कोरोनामुळे आपला जीव गमावला होता. जन्मानंतर तिसऱ्या दिवशीच त्याला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर 11 दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते.

Published by: Kiran Pharate
First published: April 16, 2021, 2:37 PM IST

ताज्या बातम्या