मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /कोरोनानं आर्थिक घडी विस्कटली; दुसऱ्या लाटेत करोडोंनी गमावल्या नोकऱ्या, 97% कुटुंबाचं उत्पन्न घटलं

कोरोनानं आर्थिक घडी विस्कटली; दुसऱ्या लाटेत करोडोंनी गमावल्या नोकऱ्या, 97% कुटुंबाचं उत्पन्न घटलं

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे (2nd Wave of Coronavirus) एक कोटीहून अधिकांनी आपली नोकरी गमवावी (1 Crore Indians Lost Jobs)लागली आहे.

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे (2nd Wave of Coronavirus) एक कोटीहून अधिकांनी आपली नोकरी गमवावी (1 Crore Indians Lost Jobs)लागली आहे.

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे (2nd Wave of Coronavirus) एक कोटीहून अधिकांनी आपली नोकरी गमवावी (1 Crore Indians Lost Jobs)लागली आहे.

नवी दिल्ली 01 मे : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे (2nd Wave of Coronavirus) एक कोटीहून अधिकांनी आपली नोकरी गमवावी (1 Crore Indians Lost Jobs) लागली आहे. तर, मागील वर्षी कोरोनाच्या प्रसाराला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत 97 टक्के कुटुंबांच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमीचे (CMIE) मुख्य कार्यकारी अधिकारी महेश व्यास यांनी सोमवारी याबद्दलची माहिती दिली.

पीटीआयसोबत केलेल्या बातचीतीत व्यास म्हणाले, की संशोधन संस्थेच्या अभ्यासानुसार, बेरोजगारीचा दर मे महिन्यात 12 टक्क्यांवर पोहोचला. जो एप्रिलमध्ये आठ टक्के होता. याचाच अर्थ या काळात जवळपास एक कोटी भारतीयांना आपली नोकरी गमावली. त्यांनी म्हटलं, की नोकरी जाण्याचं मुख्य कारण आहे, कोरोनाची दुसरी लाट.

व्यास यांच्या म्हणण्यानुसार, ज्या लोकांची नोकरी गेली आहे, अशांना नवी नोकरी शोधण्यात बऱ्याच अडचणी येत आहेत. असंघटित क्षेत्रात वेगाने नोकर्‍या तयार होत जातात परंतु संघटित क्षेत्रात चांगल्या नोकर्‍या मिळण्यास वेळ लागतो. उल्लेखनीय बाब म्हणजे, मागील वर्षी मे महिन्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बेरोजगारीचा दर 23.5 टक्क्यांवर पोहोचला होता. अनेक तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे, की कोरोनाची दुसरी लाट आपल्या उच्चांकावर पोहोचली आहे. आता राज्य लॉकडाऊन शिथील करत असून आर्थिक दृष्टीनं विविध गोष्टींना परवानगी देण्यास सुरुवात झाली आहे.

मिक्स अँड मॅच लसीकरण फायदेशीर ठरेल का? जाणून घ्या काय सांगतात अभ्यासक

व्यास म्हणाले, की 4 ते 5 टक्के बेरोजगार दर हा भारतीय अर्थव्यवस्थेच्या मानानं सामान्य मानला जाऊ शकतो. मात्र, सध्याची आकडेवारी पाहाता स्थिती सामान्य होण्यास वेळ लागेल, असं दिसत आहे. त्यांनी सांगितलं, की सीएमआयईनं एप्रिलमध्ये 1.75 लाख कुटुंबाचा देशव्यापी सर्व्हे केला. यातून उत्पन्नाबाबत चिंताजनक स्थित समोर आली. त्यांच्या म्हणण्यानुसार, सर्व्हेमध्ये सहभागी असलेल्या केवळ तीन टक्केच कुटुंबांनी त्यांचं उत्पन्न वाढल्याचं सांगितलं. 55 टक्के लोकांनी म्हटलं, की आर्थिक उत्पन्न कमी झालं आहे. तर, 42 टक्के लोकांनी उत्पन्न आधीइतकंच असल्याचं सांगितलं. व्यास म्हणाले, की महागाईसोबत तुलना केल्यास देशातील 97 टक्के कुटुंबांचं उत्पन्न महामारीदरम्यान कमी झालं आहे.

First published:
top videos

    Tags: Corona virus in india, Jobs