• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • ZP Gadchiroli Recruitment: जिल्हा परिषद गडचिरोली इथे 'या' पदांसाठी होणार भरती; 80,000 रुपये पगार

ZP Gadchiroli Recruitment: जिल्हा परिषद गडचिरोली इथे 'या' पदांसाठी होणार भरती; 80,000 रुपये पगार

अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

 • Share this:
  गडचिरोली, 08 नोव्हेंबर: जिल्हा परिषद गडचिरोली (Zilla Parishad Gadchiroli) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ZP Gadchiroli Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. शिक्षक, वॉर्डन, सुरक्षा रक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या जागांसाठी भरती शिक्षक (Teacher) वॉर्डन (Warden) सुरक्षा रक्षक (Security Guard) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शिक्षक (Teacher) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. वॉर्डन (Warden) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.SW/M.SW पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. सुरक्षा रक्षक (Security Guard) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी होम गार्डसचं ट्रेनिंग घेतलं असणं आवश्यक आहे. Amazon Recruitment: ई-कॉमर्स वेबसाईट Amazon मध्ये Financial Analyst पदांसाठी जागा रिक्त; असं करा अप्लाय इतका मिळणार पगार शिक्षक (Teacher) - 80,000/- रुपये प्रतिमहिना वॉर्डन (Warden) - 12,000/- रुपये प्रतिमहिना सुरक्षा रक्षक (Security Guard) - 8,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठी पत्ता शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गडचिरोली, नवेगाव परिसर, गडचिरोली- 442605 अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 18 नोव्हेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: