मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

मेहनतीच्या बळावर दुर्गम भागातील तरुण झाला STI, गावानं केलं जंगी स्वागत

मेहनतीच्या बळावर दुर्गम भागातील तरुण झाला STI, गावानं केलं जंगी स्वागत

सागर तळपे

सागर तळपे

सागर तळपे असे या तरुणाचे नाव आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India
  • Published by:  Khushalkant Dusane

पुणे, 28 नोव्हेंबर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची म्हणजे एमपीएसची परिक्षा राज्यात सर्वात प्रतिष्ठेची आणि तितकीच कठीण मानली जाते. दरवर्षी लाखो विद्यार्थी मुलेमुली या ही परिक्षा देतात. मात्र, त्यातून शेकडोच मुले त्यात प्राविण्य मिळवतात. अनेकांना तर अनेक वर्ष मेहनत करुनही या परिक्षेत अपेक्षित यश मिळत नाही. त्यामुळे या परिक्षेला महत्त्वाचे स्थान आहे.

याच एमपीएससी परिक्षेत एका दुर्गम भागातील तरुणाने घवघवीत यश मिळवत एसटीआय म्हणजेच विक्रीकर निरीक्षक या पदाला गवसणी घातली आहे. यानंतर गावाने त्याचे जंगी स्वागत केले आहे.

पुण्याच्या मावळ तालुक्यातील तरुणाने संपूर्ण गावाला अभिमान वाटावा, असे काम करत एसटीआय पदाला गवसणी घातली आहे. सागर तळपे असे या तरुणाचे नाव आहे. सागर हा मावळ तालुक्यातील दुर्गम भागातील तळपेवाडी येथील रहिवासी आहे. इतर लाखो विद्यार्थ्यांप्रमाणे त्यानेसुद्धा अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यासाठी त्याने अनेक वर्ष प्रचंड मेहनत केली आणि अखेर एसटीआय पदाला गवसणी घातली आहे.

हेही वाचा - प्रेयसीची 'ती' एक अट अन् बारावी नापास मुलगा झाला IPS अधिकारी; कथा मनोज कुमार शर्मांच्या जिद्दीची

गावकऱ्यांनी काढली जंगी मिरवणूक -

दरम्यान, सागर तळपे या तरुणाने मिळवलेल्या या यशानंतर गावाकऱ्यांनी त्याचा जोरदार सत्कार केला. बैलगाडीवर त्याची मिरवणूक काढण्यात आली. ढोल लेझिमच्या गजरात त्याची मिरवणूक काढण्यात आली. सागर हा माजी सरपंच किसनराव तळपे यांचा मुलगा आहे. संपूर्ण परिसरात त्याच्या या यशाचे कौतुक केले जात आहे.

First published:

Tags: Mpsc examination, Pune, Success story